Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Public Sector Banks : सरकारी बँकांचा नफा 65 टक्क्यांनी वाढला

Public Sector Banks

Image Source : www.livemint.com

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात वाढ झाल्याची आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs – Public Sector Banks) चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात वाढ झाल्याची आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (PSBs – Public Sector Banks) चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 65 टक्क्यांनी जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र (BoM – Bank of Maharashtra) ने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र आघाडीवर

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिमाही निकालांनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा 139 टक्क्यांनी वाढून 775 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, बँक ऑफ महाराष्ट्रने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक नफ्यात वाढ नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) एमडी राजीव यांनी सांगितले की जानेवारी-मार्च तिमाहीत बँक QIP (QIP - qualified institutional placement) द्वारे 1000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. याद्वारे सरकार हिस्सा विकणार आहे.

दुसऱ्या क्रमांकावर युको बँक, जाणून घ्या इतर बँकांची स्थिती

तिसर्‍या तिमाहीत 653 कोटी रुपयांचा नफा कमावत कोलकाता स्थित युको (UCO) बँक दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील नफ्यापेक्षा हे प्रमाण 110 टक्के अधिक आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक देखील या तिमाहीत 100 टक्क्यांहून अधिक नफ्यात वाढ करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. मुंबईस्थित युनियन बँक ऑफ इंडियाने 2,245 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 107 टक्क्यांनी अधिक आहे. चेन्नईस्थित इंडियन बँकेचा नफाही 102 टक्क्यांनी वाढून 1,396 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

12 पीएसबीला किती नफा झाला?

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सर्व 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 17,729 कोटी रुपये होता. अशाप्रकारे या बँकांच्या एकत्रित नफ्यात 65 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण 70,166 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या 48,983 कोटी रुपयांच्या तुलनेत 43 टक्के जास्त आहे.

बँकांच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 15,306 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, जो सप्टेंबर तिमाहीत 25,685 कोटी रुपये आणि डिसेंबर तिमाहीत 29,175 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.