Govt Bank FD rates: रिझर्व्ह बँकेकडून मागील काही दिवसांपासून सतत व्याजदरात वाढ करण्यात आहे. त्यामुळे कर्जही महाग झाली आहे. दरम्यान, सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींवर व्याजदरातही वाढ केली आहे. सुरक्षित आणि कमी जोखीम असल्याने भारतीयांकडून FD गुंतवणुकीला पसंती दिली जात आहे. देशातील सरकारी बँकांनीही FD वर आकर्षक व्याजदर देण्यास सुरुवात केली आहे. व्याजदर महागाईच्या दरापेक्षा जास्त असल्याने नागरिकांचा ओढाही FD कडे आहे. पाहूया प्रमुख सरकारी बँकांचे दीर्घकालीन FD वरील दर काय आहेत.
अनेक सरकारी बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर 7.75 ते 8.5% पर्यंत वाढवले आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा मुदत ठेव हा सुरक्षित पर्याय आहे. दीर्घ कालावधीसाठीच चांगले व्याजदर मिळत असून अल्प कालावधीच्या गुंतवणूकीवरील व्याजदर कमीच आहेत. त्यामुळे जर तुम्ही दीर्घ काळासाठी FD मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर खालील दर नक्की चेक करा.
FD rates बँकांच्या संकेतस्थळावरुन घेतले आहेत. आकडेवारीची खात्री करुन घ्यावी.
ज्येष्ठ नागरिक सरकारी बँकातील मुदत ठेवीत गुंतवणूक करुन जास्तीत जास्त 8.5% व्याजदर मिळवू शकतात. 400 दिवसांच्या मुदत ठेवींवर स्टेट बँक सर्वसामान्य नागरिकांना 7 .1% व्याजदर देत असून ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याजदर मिळेल. इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया 800 दिवसांच्या मुदत ठेवींवर 7.3% व्याजदर देत आहे. तर 444 दिवसांच्या FD वर सेंट्रल बँक 7.25% व्याजदर देत आहे. Punjab and Sind Bank 221 दिवसांच्या मुदत ठेवींवर 8% व्याजदर देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 8.5% व्याजदर देत आहे. मात्र, यासाठी ऑनलाइन पद्धतीने FD मध्ये गुंतवणूक करावी लागेल.
मुदत ठेवा हा गुंतवणुकीचा साधा सोपा पर्याय आहे. यामध्ये किती टक्के व्याजदर मिळणार हे आधीच माहिती असल्याने गुंतवणूकदाराच्या मनात भीती राहत नाही. तसेच पैसे माघारी काढून घेण्यामध्येही गुंतवणूकदार निश्चिंत असतात. (Govt Bank FD rates) सरकारी बँकांना गव्हर्नमेंटची हमी असते, त्यामुळे नागरिकांचा कल PSU बँकात FD करण्याकडे असतो. पोस्ट ऑफिस, गव्हर्नमेंट बाँड्स, टार्गेट मॅच्युरिटी फंड हे काही इतर पर्यायही नागरिकांसाठी उपलब्ध असतात. ज्यामध्ये सुरक्षितता जास्त असते.
म्युच्युअल फंडातून निश्चित परतावा मिळण्याची हमी नसते. तसेच या फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केली तरी निश्चित परताव्याची हमी देता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आपली जोखीम घेण्याची क्षमता पाहून गुंतवणूक करू शकतात. मागील काही दिवसांत सरकारी आणि खासगी बँकांनीही FD दर वाढवले आहेत. या पर्यायामध्ये गुंतवणुकीचा कल वाढत आहे.