Mutual Fund: भविष्यात अधिक निधी मिळविण्यासाठी लोक अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याची तयारी करतात. म्युच्युअल फंड(Mutual Fund) हा कमी जोखीम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय असू शकतो. 2023 मध्ये जर तुम्ही देखील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि भविष्यात तुम्हाला आणखी निधी हवा असेल, तर तुम्हाला पद्धतशीरपणे योजना आखावी लागेल. मोठा निधी उभारण्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला 5 वर्षात 50 लाखांची रक्कम हवी असल्यास, तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील आणि तुम्हाला किती परतावा मिळेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच, तुम्ही कोणत्या प्रकारच्या फंडात पैसे गुंतवू शकता हे देखील जाणून घ्या.
5 वर्षात 50 लाख रुपये कसे तयार होतील?
अग्रेसिव गुंतवणूकदार, जे अधिक जोखीम घेऊ शकतात आणि फक्त 5 वर्षांत 50 लाख रुपयांचा निधी तयार करू इच्छितात, अशांनी फ्लेक्सी कॅप फंड(flexi cap funds) किंवा मल्टी कॅप फंडात(multi cap funds) गुंतवणूक करावी. तज्ञांचे मत आहे की, गुंतवणूकदारांना या फंडांमध्ये 15 टक्के परतावा मिळू शकतो. यासाठी गुंतवणूकदारांना एसआयपीद्वारे(SIP) दरमहा 55,750 रुपये गुंतवावे लागतील.
'या' फंडांनी चांगला परतावा दिला आहे
HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने एका वर्षात 19.98 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे क्वांट फ्लेक्सिकॅप फंडाने(Quant Flexi cap Fund) 13.64 टक्के परतावा दिला आहे आणि ICICI प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप फंडाने 11.20 टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाने सरासरी 15.90 टक्के परतावा दिला आहे. याशिवाय, क्वांट मल्टीकॅप फंडाने 13.16 टक्के, कोटक मल्टीकॅप फंडाने 13.16 टक्के आणि एचडीएफसी(HDFC) मल्टीकॅप फंडाने 12.37 टक्के परतावा दिला आहे.
कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काय करावे?
तुम्ही कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्या फंडाची संपूर्ण माहिती घ्यावी. तसेच, म्युच्युअल फंडांची तुलना देखील केली पाहिजे. जोखीम आणि परताव्याच्या आधारावर तुम्ही कोणत्याही फंडात तुमच्या गुंतवणुकीची योजना करू शकता.
(Disclaimer: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)