Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर करणार 2 लाख कोटी रुपये खर्च..

Budget 2023: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर करणार 2 लाख कोटी रुपये खर्च..

Image Source : http://www.scroll.in/

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली.

Budget 2023: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली. त्यामध्ये त्यांनी कोविड, सरकारी योजना त्याचबरोबर अनेक योजनांवर केलेल्या आणि करत असणाऱ्या खर्चाबाबत सांगितले. त्याचबरोबर दररोज उपाशी झोपणाऱ्या लोकांसाठी महत्वाचा निर्णय सादर केला आहे. 80 करोड लोकांना मोफत अन्न मिळणार अशी घोषणा बजेट सादर करतांना केली आहे. संपूर्ण देशाचे, इंडस्ट्रीचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष या बजेटकडे आहे. या बजेटमधून अनेकांच्या भरपूर अपेक्षा आहे. 

2 लाख करोड करणार खर्च….. (2 lakh crore will be spent...)

बजेट सादर करतांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महत्वाची घोषणा केली. देशातील कोणताही व्यक्ती उपाशी झोपता कामा नये, त्याकरिता 80 करोड लोकांना मोफत अन्न धान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर 2 लाख करोड खर्च करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आधीही देशात रेशन कार्डच्या माध्यमातून अनेकांना मोफत अन्न मिळत होते. तरीही त्यातून अनेक कुटुंब वंचित राहलेले आहेत. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर भर…..  (Emphasis on Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana…..)

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार 2 लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर 7400 करोड डिजिटल upi पेमेंट झाले आहे म्हणजे डिजिटल इंडियाचे स्वप्न आपण लवकरच गाठणार असेही निर्मला सितरामन म्हणाल्या.