Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Preclosure: मुदतीपूर्वीच गृहकर्ज परत फेडायचे आहे मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Home Loan

Home Loan Preclosure: तुम्हाला जर तुमचे होम लोनचे प्री क्लोजर करायचे असल्याचे पहिल्यांदा या प्रोसेसमध्ये बँकेतील क्रेडिट मॅनेजरशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तुमच्या गृहकर्जाचा स्टेटस जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला प्री क्लोजर करायचे असल्यास तसे पत्र तुम्ही बँकेला सादर करु शकता.

गृहकर्जाचा कालावधी सर्वसाधारणपणे 10 ते 20 वर्ष या दरम्यान असतो. मात्र या दरम्यान कर्जदाराला मोठी रक्कम प्राप्त झाली तर तो गृहकर्जाची पूर्ण फेड करु शकतो. मुदतीपूर्वीच होम लोनची परत फेड केल्यास (Home Loan Preclosure) बँकांकडून अनेक शुल्क आकारले जाते. त्यामुळे मुदतीपूर्वी कर्जफेड करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे दिर्घमुदतीच्या होममध्ये कर्जदाराकडून प्री क्लोजर किंवा मुदतीपूर्वीच कर्जफेड करण्याला प्राधान्य दिले जाते. कर्जाची पूर्णफेड करताना व्याजाची बचत करणे हा मूळ उद्देश असतो.

प्री क्लोजरसाठी कर्जदार रिफायनान्सिंगचा पर्याय निवडतो. अनेकदा मूळ कर्ज जादा व्याजदराने घेतलेले असते. ते फेडून कमी व्याजदरात दुसरे कर्ज घेण्याकडे कर्जदारांचा कल असतो. त्यामुळे कर्जाचा निम्मा कालावधी पूर्ण झाला की कर्जदारा प्री क्लोजरचा पर्याय निवडतात.

तुम्हाला जर तुमचे होम लोनचे प्री क्लोजर करायचे असल्याचे पहिल्यांदा या प्रोसेसमध्ये बँकेतील क्रेडिट मॅनेजरशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तुमच्या गृहकर्जाचा स्टेटस जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला प्री क्लोजर करायचे असल्यास तसे पत्र तुम्ही बँकेला सादर करु शकता.

प्री क्लोजर करताना बँक छुपे शुल्क आकारत नाही ना याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. दिर्घकालावधीसाठी कर्ज देताना बँकांसाठी तो उत्पन्नाचा मोठा भाग असतो. त्यात कर्जदाराने प्री क्लोजर केले तर बँकेला कर्ज कालावधीत मिळणारे नियमित उत्पन्न गमवावे लागते. त्यामुळे अशावेळी शिल्लक थकबाकीवर बँकेकडून प्री क्लोजर चार्जेस आकारले जाऊ शकतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी बँक शुल्क आकारणार आहे का याची खात्री करायला हवी.

व्याज बचत करण्याच्या उद्देशाने प्री क्लोजर करण्याचा निर्णय घेतला तरी बँकेच्या चार्जेसमुळे कर्जदार अडचणीत येऊ शकतो. अनेकदा प्री क्लोजर चार्जेसची रक्कम ही व्याजापेक्षा जास्त असण्याची शक्यता असते.  

गृहकर्जाची शिल्लक रक्कम बँकेकडे जमा केल्यानंतर कर्ज घेताना दिलेल्या सर्व कागदपत्रे परत घेणे आवश्यक आहे. कर्ज मंजुरीसाठी दिलेल्या ओरिजनल कागदपत्रांची लिस्ट सोबत असल्यास त्यानुसार खात्रीकरुन घेणे सोपे जाईल.

गृहकर्जाची मुदतीपू्र्वीच परत फेड केल्यानंतर सर्वात महत्वाचा दस्त म्हणजे बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे. या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटमध्ये बँक आणि कर्जदार यांनी परस्पर संमतीने कर्जाची मुदतीपूर्वीच परत फेड केल्याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा दस्त अत्यंत महत्वाचा आहे.