देशातील नामांकित पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वोत्तम व्याजदर देण्यासाठी ओळखली जाते. मात्र जून महिन्याच्या 1 तारखेपासून बँकेने निवडक एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत. बँकने ग्राहकांना एफडी करण्यासाठी 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतचा कालावधी दिला आहे. या कालावधीसाठी 3.05% ते 7.25% व्याज देण्यात येत आहे. या निमित्ताने बँक सध्या कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देते, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सर्वाधिक व्याजदर किती?
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एफडीवरील व्याजदरात कपात केल्यानंतर सर्वाधिक व्याजदर हा 444 दिवसांच्या एफडीसाठी देण्यात येत आहे. या कालावधीसाठी बँक सर्वाधिक 7.25% व्याज देत आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांना कालावधी आणि त्यावर मिळणार व्याजदर जाणून घेणे गरजेचे आहे.
व्याजदरात केली 'इतकी' कपात
एक वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना देत असलेल्या व्याजदरात 5 बीपीएसने कपात केली आहे. ज्यामुळे एफडीवरील व्याजदर हा 6.80% वरून 6.75% करण्यात आला आहे. मागील महिन्यात 666 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 7.25% वरून 7.05% करण्यात आला होता.
'या' कालावधीसाठी मिळतोय इतका व्याजदर
7 दिवस ते 45 दिवसांच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी बँक सर्वसामान्य ग्राहकांना 3.50% व्याज देत असून ज्येष्ठ नागरिकांना 4% व्याजदर देत आहे.
46 दिवस ते 179 दिवसांच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी बँक सर्वसामान्य ग्राहकांना 4.50% व्याज देत असून ज्येष्ठ नागरिकांना 5% व्याजदर देत आहे.
180 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना 5.50% व्याज देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिकांना 6% व्याजदर दिला जात आहे.
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना 5.80% व ज्येष्ठ नागरिकांना 6.30% व्याजदर दिला जात आहे.
1 वर्षाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.75% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याज देण्यात येत आहे.
444 दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीत मिळेल 'इतका' व्याजदर
444 दिवसांच्या विशेष एफडी कालावधीसाठी बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर दिला जात आहे.
445 दिवस ते 665 दिवस आणि 667 दिवस ते 2 वर्षापर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना बँक 6.80% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% व्याज देण्यात येत आहे.
तर 666 दिवसांच्या विशेष एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.05% व ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज देण्यात येत आहे.
याशिवाय 3 वर्षाहून अधिक ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी सर्वसामान्य लोकांना बँक 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 7% व्याज देत आहे.
5 वर्ष ते 10 वर्षाच्या दीर्घ कालावधीसाठी सर्वसामान्य लोकांना 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% इतका व्याजदर देण्यात येत आहे.
Source: hindi.moneycontrol.com