विश्वकर्मा दिनानिमित्त सुतार, लोहार, चर्मकार यासारख्या कारागिरांची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा रविवारी 17 सप्टेंबर 2023 रोजी शुभारंभ झाला. या योजनेत कारागीरांना 1 ते 2 लाखांचे कर्ज केवळ 5% व्याजदराने दिले जाईल. या योजनेत केंद्र सरकार 8% व्याज अनुदानाचा भार उचलेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी
“पीएम विश्वकर्मा” योजनेत पुढील 5 वर्षांसाठी 13000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्तर भारतात 17 सप्टेंबर हा विश्वकर्मा दिन म्हणून सादरा केला जातो. या निमित्ताने पारंपरिक कलाकौशल्याचे काम करणाऱ्यांना वाजवी दरात अर्थसहाय्य केले जाणार आहे.
योजनेच्या शुभारंभावेळी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले की हस्त-कलाकार आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना तयार करण्यात आली आहे. या समाजात आनंदाचे क्षण तयार करणाऱ्या लाखो कारागीरांच्या श्रमाचे चीज व्हावे यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
आपल्याकडे लोहार समाजाचे कारागीर आहेत ज्यांनी आपल्यासाठी लोखंडातून अवजारे तयार केली. अशाच प्रकारे सोने चांदीच्या धातूमधून आपल्याला दागिने तयार करणारे सराफा असोत किंवा मासेमारी करणारे मच्छिमार बांधव असोत या कौशल्य असणाऱ्या विविध समाजातील घटकांनी भारताला स्वावलंबी बनवेल, असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
पीएम विश्वकर्मा योजनेत कारागीरांची कौशल्य सुधारणे, अवजारांसाठी कर्ज दिले जाणार आहे. दोन टप्प्यात हे कर्ज मंजूर केले जाईल. त्यासाठी 5% व्याजदर असेल, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विणकर, सोनार, लोहार, लॉन्ड्री कामगार, नाभिक समाज अशा 18 पगड जातींचे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरण केले जाणार आहे.