Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan 15th instalment: शेतकऱ्यांना 'या' तारखेपर्यंत मिळणार 15 वा हप्ता? असा करा लगेच अर्ज

PM Kisan 15th instalment: शेतकऱ्यांना 'या' तारखेपर्यंत मिळणार 15 वा हप्ता? असा करा लगेच अर्ज

PM Kisan 15th instalment: शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम किसान सन्मान निधी' योजना सुरू केली. या योजनेचा 14 वा हप्ता सरकारने जुलै महिन्यात दिला आहे. आता 15 व्या हप्त्याचा लाभ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागवत आहे.

PM Kisan 15th instalment: शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये. तसेच वेळेत त्यांची सर्व कामे व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार 15 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवत आहे. पीएम किसानचा 15 वा  हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. काॅमन सर्व्हिस सेंटरवरूनही शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.

नोंदणी करणे आहे गरजेचे 

या योजनेद्वारा शेतकऱ्यांना वर्षात 6000 रुपयांचा लाभ मिळतो. ही रक्कम तीन हप्ता प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींच्या प्रसंगी व शेतीचे कामे सहज करता यावी यासाठी देण्यात येते. मागील महिन्यात सरकारने 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 कोटी रुपये जमा केले आहे. इतर शेतकऱ्यांना याचा जास्तीतजास्त लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

अशा पद्धतीने करा पोर्टलवरून 15 व्या हप्त्यासाठी अर्ज

  • pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या आणि Farmer’s Corner वर जा.
  • New Farmer Registration वर क्लिक करा आणि आधार नंबर आणि कॅप्चा टाका.
  • आता डिटेल्स टाका आणि 'Yes' वर क्लिक करा.
  • पीएम किसान अर्ज 2023 मध्ये विचारलेली माहिती टाका, ती सेव्ह करा आणि तुमच्या माहितीसाठी त्याची प्रिंट काढा.

या योजनेची सुरूवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली. आतापर्यंत या योजनेचा लाभ देशातील 11 कोटी शेतकऱ्यांनी घेतला असून सरकारने 2.42 लाख कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली आहे.