आपले नवीन गाडीचे स्वप्न नवीन वर्षात नाही, तर याचवर्षी करा पूर्ण. नवीन वर्षात गाड्यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने, गाडयांची किंमत वाढणार असल्याचे समजत आहे. चला, तर पाहुयात आपल्या मनपसंद गाडीचा यात समावेश आहे का?
Table of contents [Show]
मारूती (Maruti Car)
1 जानेवारी 2023 पासून मारूती कंपनीच्या विविध मॉडेल्सनुसार किंमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे. भारतीयांसाठी बजेट सेगमेंटमधील मारूती कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑल्टो, ऑल्टो के 10, इन्गिस, वॅगनार, स्विफ्ट, डिझायर, सेलेरिओ, ब्रेझा, एस-प्रेसो, इको, सियाज, एक्सएल 6, अर्टिगा व ग्रॅंड विटार या चारचाकी गाडयांचा समावेश आहे.
हयुंदाई (Hyundai Car)
नवीन वर्षात हयुंदाईच्या गाडयांच्या किंमतीत चांगलीच वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे हयुंदाई गाडी खरेदी करण्याच्या स्वप्नावर थोडे पाणी पडणार असल्याचे दिसत आहे. थोडा दिलासा म्हणजे, हयुंदाई कंपनीने किती टक्के दरवाढ होणार आहे याची अधिकृत माहिती दिली नाही. मात्र दरात जास्त वाढ होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
किआ (Kia Car)
किआ कंपनी ही कमी कालाधीत अधिक लोकप्रिय झाल्याची दिसून येते. कारण नोव्हेंबरमध्ये किआच्या 6 लाख वाहनांची विक्री झाली असल्याचे समजत आहे. ही कंपनी नवीन वर्षात वाहनांच्या किंमतींमध्ये 50 हजार रूपयांची वाढ करणार असल्याची शक्यता आहे. गाडयांच्या मॉडेलनुसार किंमतीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे किओ गाडी प्रेमी ग्राहकांनी गाडी आताच खरेदी करण्यावर जोर द्यावा हा खासगी सल्ला आहे.
जीप (Jeep)
जीप ही ग्राहकांची वाढती मागणी ठरत आहे. सध्या जीप खरेदी करण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे जीप ग्राहकांनी लक्ष द्या की, जीप मेरिडियन, जीप ग्रॅड चेरोकी, जीप रेंगलर यांसारखे सर्व मॉडेल्स महागणार असल्याचे वर्तविले जात आहे. कंपनीने यावर्षी वाहनांच्या किंमतीत तब्बल चार वेळा वाढ केली आहे.
ऑडी व मर्सिडिजचेही दर वाढणार
ऑडी व मर्सिडिजच्या गाडया खरेदी करण्याचा एक वेगळा वर्ग आहे. या वर्गामध्ये ही गाडी मोठया प्रमाणावर खरेदी केली जाते. या ग्राहकांनीदेखील गाडयांच्या दरवाढीवर लक्ष दिले पाहिजे. आपला पैसा वाचवायचा असेल, तर याचवर्षी गाडी खरेदी करण्यावर जोर द्यावा. कारण ऑडी किंमतीत 1.7 टक्के तर मर्सिडिजच्या किंमतीत 5 टक्के वाढ होणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे वेळीच गाडी खरेदी करण्याचे योग्य नियोजन करा.