पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. मे 2022 नंतर इंधन दर जैसे थेच असून पेट्रोलियम कंपन्यांची कमाई सुरुच आहे.
आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यात इंधन दर स्थिर आहेत. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 106.32 रुपये आणि डिझेलचा भाव 94.27 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव 96.72 रुपये आणि डिझेलचा भाव 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये असून चेन्नईत पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे.
दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव सलग तिसऱ्या दिवशी वाढला. क्रूडचा भाव प्रती बॅरल 3% ने वाढला. तो 83.69 डॉलर प्रती बॅरलवर गेला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव प्रती बॅरल 83.69 डॉलर इतका झाला आहे. त्यात 4.1% वाढ झाली. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी रोजगाराच्या आकडेवारीबाबत समाधान व्यक्त केले आहे. रोजगार वाढत असल्याने बँकेला व्याजदर वाढवण्यास वाव मिळाला असल्याचे पॉवेल यांनी म्हटले आहे.
नुकसान भरुन काढण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न
भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. मागील दोन महिन्यात क्रूड ऑईलचा भाव घसरला होता. मात्र त्यावेळी कंपन्यांनी इंधन दरात कपात केली नाही. मे 2022 पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाचा भाव 139 डॉलरवर गेला होता. त्यावेळी पेट्रोलियम कंपन्यांना नुकसान झाले होते. ते नुकसान भरुन काढण्यासाठी इंधन दर जैसे थेच ठेवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.