पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी 20 फेब्रुवारी 2023 रोजी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. (Petrol and Diesel Rate In Mumbai remain unchanged) आज प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. मे 2022 नंतर इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेल दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने दररोज सकाळी सहा वाजता कंपन्यांकडून किरकोळ विक्रीचा दर जाहीर केला जातो.
आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव 96.72 रुपये आणि डिझेलचा भाव 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये असून चेन्नईत पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे.
दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव तेजीत आहे. गेल्या शुक्रवारी क्रूडचा भाव 2 डॉलरने कमी झाला होता. त्यातून तो आज सावरला. आज सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव 9 सेंट्सने वाढला असून तो 82.91 डॉलर प्रती बॅरल इतका वाढला आहे. वेस्ट टेक्सासमध्ये क्रूडचा भाव 76.40 डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत 6 सेंट्सने वाढ झाली.
भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. दररोज सकाळी सहा वाजता कंपन्यांकडून इंधन दर जाहीर केले जातात. मागील तीन महिन्यात खनिज तेलाच्या किंमतीत घसरण झाली होती. मात्र त्यावेळी कंपन्यांनी इंधन दरात कपात केली नाही. मे 2022 पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाचा भाव 139 डॉलरवर गेला होता. त्यावेळी पेट्रोलियम कंपन्यांना जवळपास 21200 कोटींचे नुकसान झाले होते. ते नुकसान भरुन काढण्यासाठी इंधन दर जैसे थेच ठेवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
इंधन दर कमी करण्याचे पेट्रोलियम मंत्र्यांचे आवाहन
खनिज तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर कमी करावेत, असे आवाहन केले होते. जागतिक बाजारात तेलाचा दर कमी झाल्यास किंवा आर्थिक नुकसान भरुन काढल्यास कंपन्यांनी किंमतीत कपात करावी, असे पुरी यांनी म्हटले होते.
केरळ महागले पेट्रोल आणि डिझेल
केंद्र सरकारने मे 2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी झाला होता. याला प्रतिसाद देत भाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) कमी केला होता. दरम्यान, नुकताच पंजाब आणि केरळ या दोन राज्यात इंधन महागले. पंजाब सरकारने पेट्रोल आणि डिझेलरवर प्रती लिटर 90 पैसे अधिभार लागू केला आहे. केरळमध्ये राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल आणि मद्य यावर सामाजिक सुरक्षा अधिभार (Social Security Cess) लागू केला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रती लिटर 2 रुपयांनी महागले आहे.