Petrol- Diesel Price Today: सरकारी पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. बऱ्याच दिवसांनंतर पेट्रोल डिझेलची भाववाढ दिलासा देणारी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. आज सलग 247 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल दर पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. पेट्रोल प्रति लिटर 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. आणि सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे.
ब्लूमबर्ग एनर्जीच्या आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाच्या किमती आता प्रति बॅरल $90 च्या जवळ पोहोचल्या आहेत. WTI ची मार्च फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $81.60 वर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.16 इतकी आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
आजची किंमत काय आहे (24 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल डिझेलची किंमत)
- दिल्ली (Delhi) : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
- मुंबई (Mumbai) : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
- कोलकाता (Kolkata): पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
- चेन्नई (Chennai): पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
- हैदराबाद (Hyderabad): पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
- बंगळुरू (Bangalore): पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
- तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
- पोर्ट ब्लेअर (Port Blair): पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
- भुवनेश्वर (Bhubaneswar): पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
- चंदीगड (Chandigarh) : पेट्रोल 96.92 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
- लखनौ (Lucknow) : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
- नोएडा (Noida): पेट्रोल रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
- जयपूर (Jaipur) : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
- पाटणा (Patna): पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर.
- गुरुग्राम (Gurugram): 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढलेले दिसत आहेत आणि सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेल इतके महागले आहे.
आजचे दर एसएमएसद्वारे (SMS)जाणून घ्या
जर तुम्हाला दररोज पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही एसएमएसद्वारेही (SMS) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाणून घेऊ शकता. (How to Check Diesel Petrol Price Daily). इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक RSP टाइप करून 9224992249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहक 9223112222 या क्रमांकावर SMS पाठवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPrice हा मेसेज पाठवून देखील जाणून घेऊ शकतात.