Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pros and Cons of Personal loan : पर्सनल लोन आणि त्याचे फायदे-तोटे घ्या जाणून

Pros and Cons of Personal loan

काही वेळा पैशाची गरज निर्माण होते यावेळी पर्सनल लोनचा विचार केला जातो. हे पर्सनल लोन म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत, फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही आहेत ते कोणते, हे सगळे जाणून घेऊया.

काही वेळा पैशाची गरज निर्माण होते यावेळी पर्सनल लोनचा विचार केला जातो. हे पर्सनल लोन म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत, फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही आहेत ते कोणते,  हे सगळे जाणून घेऊया. 

आपण ज्यावेळी कर्ज घेतो (loan) त्यावेळी आपल्याला काही तारण ठेवावे लागत नाही, अशा लोनला पर्सनल लोन असे म्हटले जाते.  कोणत्याही कारणासाठी हे कर्ज बँकेकडून घेता येते. हे या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. बाकी व्यवसाय, वाहन यासारख्या कारणासाठी आपण जेव्हा कर्ज  घेतो तेव्हा  ते त्यामध्येच खर्च करावे लागते.

वैयक्तिक कर्जाचे फायदे (Pros of Personal loan)

वैयक्तिक कर्ज घेताना विशिष्ट खर्चच करावा अशी त्यात अट नसते हा एक आणि काही तारण ठेवावे लागत नाही हा दूसरा, असे पर्सनल लोनचे फायदे आहेतच. त्याचबरोबर हे कर्ज लगेच मंजूर होऊ शकते हा याचा आणखी एक महत्वाचा फायदा आहे. पैशाची गरज अचानक केव्हाही निर्माण होऊ शकते. यावेळी लवकर पैसे मिळणे आवश्यक असते. काहीवेळा त्यासाठी फारसा विलंब परवडनणारा नसतो. उदा.  आजारपणणासारखी बाबही अचानक समोर येऊ शकते. याचबरोबर अन्य कारणासाठीही हा खर्च केला जाऊ शकतो.  फ्रीज , टिव्ही, घरातील फर्निचर, पर्यटन ही अशा काही उदाहरणे सांगता येतील.

पर्सनल लोन हे सुद्धा विशिष्ट कालावधीत हप्त्याहप्त्याने भरता येते. क्रेडिट कार्डच्या तुलनेत कमी व्याजदर हा याचा महत्वाचा फायदा आहे. अनेकदा क्रेडिट कार्डवर उत्साहाच्या भरात खरेदी केली जाते. मात्र नंतर व्याज भरताना मासिक बजेट कोलमडताना दिसते.

यामुळे आपल्याला एकदम कर्ज फेडण्याची गरज लागत नाही. वैयक्तिक कर्जाचा कालावधी व हप्त्याची रक्कम आपल्याला ठरवत येते.  दीर्घ कालावधीसाठी म्हणजे 60 महिन्यांच्या कालावधीसाठी सुद्धा आपण हे कर्ज घेऊ शकतो. वैयक्तिक कर्ज देताना पगार महत्वाचा ठरतो. जास्त कागदपत्रांची जमवाजमव करण्याची गरज नसते. यादृष्टीने देखील पर्सनल लोन महत्वाचे ठरते. पर्सनल लोन चा रेट हा क्रेडिट कार्ड पेक्षा कमी असतो हाही एक त्याचा फायदा म्हणता येईल.

वैयक्तिक खर्चाचे तोटे काय आहेत (Cons of Personal loan )

वैयक्तिक कर्जाचे काही तोटेदेखील आहेत. त्याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. यासाठी काही तारण ठेवावे लागत नाही. हा जसा त्याचा फायदा आहे तसा त्यात एक तोटासुद्धा आहे. यामुळे हे कर्ज असुरक्षित समजले जाते. इतर कर्जापेक्षा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो. तसेच त्याच्यावर फी व दंडसुद्धा जास्त आकारला जातो. परतफेड योग्य प्रकारे न झाल्यास इंटरेस्ट रेट वाढतो. 

पर्सनल लोनचे असे काही फायदे– तोटे आहेत. पर्सनल लोन घेण्याचा निर्णय घेताना सारासार विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते.