Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Funds in India: जाणून घ्या पेन्शन फंडचे प्रकार आणि फायदे!

Pension Funds in India

Pension Funds in India: पेन्शन फंड प्लॅन ही अशी योजना आहे; जेव्हा तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. त्यावेळी तिचा तुम्हाला आधार होऊ शकतो.

पेन्शन फंड, हे रिटायरमेंट फंड म्हणूनही ओळखले जातात. हा एक प्रकारचा गुंतवणूक प्लॅन (Investment Plan) आहे. जिथे तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नापैकी किंवा पगारातील काही भाग जाणीवपूर्वक बचत योजनेमध्ये गुंतवता. या फंडचा मुख्य उद्देश तुमची नियमित नोकरी किंवा सेवा संपल्यानंतर निश्चित उत्पन्न सुरू राहील.

सध्या महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. हा दर लक्षात घेता पेन्शन फंड ही सर्वांसाठी लाभदायक ठरणारी योजना आहे. जरी तुमच्या बॅंक खात्यात पुरेशी रक्कम असली तरी, तुम्ही पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. कारण आर्थिक आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. यासाठी तयार असणे गरजेचे आहे. त्यामुळे पेन्शन योजना ही सर्वांसाठी गरजेची आहे. पेन्शन फंड प्लॅन ही अशी योजना आहे; जेव्हा तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. त्यावेळी तिचा तुम्हाला आधार होऊ शकतो.

भारतात साधारणपणे पेन्शन प्लॅन दोन भागांमध्ये विभागला जातो. पहिला भाग म्हणजे तुम्ही जेव्हा पैसे कमावत असता तेव्हा त्यातील एक ठराविक रक्कम नियमितपणे म्हणजे तुमच्या रिटायरमेंटपर्यंत पेन्शन प्लॅनसाठी बचत केली जाते. दुसरा भाग म्हणजे, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष निवृत्त / रिटायर होता, तेव्हा तो सुरू होतो. म्हणजेच निवृत्त झाल्यानंतर मृत्यु होईपर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्हाला पेन्शनची ठराविक रक्कम मिळते.

भारतातील पेन्शन फंडचे प्रकार | Types of Pension Funds in India

भारतात पेन्शन फंड हे ढोबळमानाने 3 प्रकारांमध्ये विभागले जातात.

1. पेन्शन फंड इन्शुरन्स कंपनीद्वारे उपलब्ध करून दिला जातो. या फंडमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम फक्त डेब्ट योजनांमध्ये गुंतवली जाते आणि हा फंड सावधगिरीने आणि कमी जोखीम घेणाऱ्यांसाठी बेस्ट आहेत.

2. युनिट लिंक प्लॅन या योजनेद्वारे जमा होणारा निधी डेब्ट आणि इक्विटी अशा दोन्ही प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवला जातो. हा सर्वाधिक गुंतवणूक केला जाणारा पेन्शन प्लॅन आहे. 

3. नॅशनल पेन्शन स्कीम, हा सरकारद्वारे राबवला जाणारा फंड आहे. या योजने अंतर्गत जमा होणारा निधी सरकारी रोखे आणि डेब्ट स्कीमध्ये गुंतवला जातो.

पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे! Benefits of Investing in Pension Funds!

  • पेन्शन फंड योजनेचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेद्वारे तुमची दीर्घकालीन गुंतवणूक होते. या योजनेमध्ये तुम्ही एकरकमी किंवा टप्प्या टप्प्याने पैसे गुंतवून निश्चित अशी बचत करू शकता.
  • बरेच पेन्शन फंड हे निवृत्तीनंतर किंवा एखाद्या केसमध्ये गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास एकरकमी रक्कम दिली जाते. तसेच अशाप्रकारचे पेन्शन फंड इन्शुरन्स कव्हरदेखील पुरवतात.
  • पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे महागाईचा परिणाम. या अशाप्रकारच्या योजनांमधून महागाईच्या दरानुसार परतावा मिळण्यास मदत होते.