Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Collection 5 Day: पठाण चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच, फक्त 5 दिवसात 550 कोटी रूपयांची केली जबरदस्त कमाई

Pathan Collection 5 Day

Image Source : http://www.informalnewz.com/

Pathan Box Office Collection: शाहरूख खानच्या 'पठाण' या चित्रपटाने देशातच नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगातील सर्व थिएटरमध्ये या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने फक्त पाच दिवसात 550 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Shahrukh Khan: पठाण (Pathan) चित्रपट जगातील सर्वच थिएटरमध्ये हाऊस फुल सुरू आहे. या चित्रपटाने देखील अनेक रेकाॅर्डस तोडले आहे. 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने फक्त पाच दिवसात बाॅक्स आॅफीसवर कोटींचा गल्ला जमा केला आहे. शाहरूख खानचे चार वर्षानंतर मोठया पडदयावर यशस्वी पुनरागमन झाले असे म्हणण्यास हरकत नाही. 

पाच दिवसात 550 कोटी (550 Crore in Five Days) 

25 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण जगात पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण जगात 8000 स्क्रीन्सवर हा चित्रपट दाखविण्यात येत आहे. अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने संपूर्ण  जगभरातून बाॅक्स आॅफीसवर 550 कोटी रूपये कमविले आहे. पठाण चित्रपटाने अनेक सुपरहीट चित्रपटांना मागे टाकत एक नवीन रेकाॅर्ड तयार केला आहे. 

वीकेंडला किती कमविले (Weekend Earnings)

वीकेंडला हा चित्रपट धुवा करेल असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरत, पठाण चित्रपटाचा प्रत्येक शो वीकेंडलादेखील हाऊसफुल जात होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 60 ते 62 कोटी रूपयांची अफलातून कमाई केली. भारतात या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर 280 कोटी पेक्षा ही अधिक गल्ला जमविला आहे. सोमवारी म्हणजे आज हा आकडा 300 कोटीच्या घरात जाईन असा अंदाज आहे. 

4 दिवसात 200 कोटी कमविणारा पहिला चित्रपट

फक्त 4 दिवसात 200 कोटी कमविणारा पठाण हा पहिला बाॅलिवुड चित्रपट आहे. यापूर्वी सलमान खान (Salman Khan) चा ‘सुलतान’ (Sultan) व ऋतिक रोशनच्या ‘वाॅर’ (War) चित्रपटाने 200 कोटी रूपये हे सात दिवसात कमविले होते. तर ‘केजीएफ 2’ (KGF 2) ला 200 कोटी कमाई करण्यास 5 दिवस लागले होते. तर ‘बाहुबली 2’ (Bahubali 2) ला ही रक्कम जमा करण्यासाठी सहा दिवस लागले होते.