Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Parineeti Chopra Net Worth: 12 वर्ष बॉलीवूडमध्ये काम करून परिणीतीने कमावली 'इतकी' संपत्ती

Parineeti Chopra Net Worth

Image Source : www.canbeelifestyle.com

Parineeti Chopra Net Worth: इन्व्हेस्टमेंट बँकर होण्याचे स्वप्न पाहणारी परिणीती चोप्रा अपघाताने चित्रपटसृष्टीत आली आणि तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. यातून तिने करोडोंची संपत्ती कमावली. आज आपण तिने एकूण संपत्ती कमावली. तिचे एकूण नेटवर्थ किती? हे जाणून घेणार आहोत.

'लेडीज वर्सेस रिकी बहल' (Ladies vs Ricky Bahl) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी ती एक असून आजपर्यंत तिने अनेक दर्जेदार चित्रपटांमधून स्वतःच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत. नमस्ते लंडन, दावत ए इश्क, मेरी प्यारी बिंदू, हसी तो फसी, गोलमाल अगेन, केसरी आणि नुकताच प्रदर्शित झालेला सायना या चित्रपटांमधील तिच्या अभिनयामुळे तिने लोकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परिणीती सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी अपलोड करत असते. त्यामुळेच ती सतत चर्चेत असते. पण तुम्हाला परिणीतीच्या नेटवर्थबद्दल माहीत आहे का?

Parineeti Chopra Net Worth

शैक्षणिक वाटचाल

परिणीतीचा जन्म 22 ऑक्टोंबर 1988 मध्ये हरियाणामध्ये झाला. तिचे वडील उद्योजक असल्याने अनेक सुखसोयी असलेल्या कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. तिचे शालेय शिक्षण अंबाला येथील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी हायस्कूलमध्ये (Convent of Jesus and Mary High School) पूर्ण झाले. एक हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. तिला मोठेपणी इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे होते. पण ती नकळत चित्रपटसृष्टीत आली. वयाच्या 17 व्या वर्षी तिने उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील अलायन्स मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये (Alliance Manchester Business School) प्रवेश घेतला. तिथेच तिने  बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स अशी 3 विषयांमध्ये ऑनर्स डिग्री मिळवली.

2011 साली बॉलीवूडमध्ये पदार्पण

परिणीतीला अभिनय क्षेत्रात कधीच रस नव्हता. मात्र जेव्हा तिने तिच्या चुलत बहिणीला म्हणजेच प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) अभिनयाची तयारी करताना पाहिले, तेव्हा ती अभिनयाच्या प्रेमात पडली. 2011 साली तिने बॉलीवूडमध्ये 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (Ladies vs Ricky Bahl)  या चित्रपटातून पदार्पण केले. ज्यामध्ये तिने रणवीर सिंगसोबत काम केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळाले आणि त्यानंतर परिणीतीने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील कामाला फिल्म फेअरने (Filmfare Award) गौरवण्यात आले.

अभिनयासोबत तिने अनेक सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेतला. अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांसाठी तिने धर्मादाय संस्था उभारल्या. पर्यावरणाच्या अनेक समस्यांवर तिने आवाजही उठवला. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या सरकारी कार्यक्रमाची ती ब्रँड अॅम्बेसेडर जाते.

परिणीतीची एकूण संपत्ती किती?

Caknowledge.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 8 दशलक्ष डॉलर्स  इतकी आहे. जी भारतीय चलनानुसार अंदाजे 60 कोटी रुपये आहे. तिने ही सर्व संपत्ती चित्रपटातून कमावली आहे. याशिवाय ती कुरकुरे, माझा, निव्या यासारख्या उत्पादनांची ब्रँड अॅम्बेसेडर होती. मुंबईत तिने स्वतःचे आलिशान घर खरेदी केले आहे; जे समुद्र किनाऱ्यालगत आहे. या घराची किंमत 22 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. परिणीतीच्या कार कलेक्शनमध्ये Audi A6, Jaguar XJL आणि Audi Q5 गाड्या आहेत.

Source: Caknowledge.com