भारतात सध्या कागदी चलन (Paper currency) आहे. मात्र सरकारनं 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून बाद केल्यापासून सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. सरकार कागदी चलन पूर्णपणे बंद करेल, असं लोकांना वाटू लागलंय. तसंच या कागदी चलनाची जागा प्लॅस्टिक चलन (Plastic currency) घेईल, असंही लोकांचं म्हणणं आहे. खरं तर चलन बदलाची प्रक्रिया ही राजा महाराजांच्या काळापासून सुरू आहे. पूर्वीच्या काळी चलनासाठी नाणी (Coins) वापरली जात होती. कालांतरानं कागदी चलनाची छपाई सुरू झाली. त्यापुढेही जाऊन अनेक देशांमध्ये तर आता प्लास्टिक चलन वापरलं जातंय. भारतातही प्लास्टिक चलन सुरू होईल, अशी चर्चा मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे.
Table of contents [Show]
भारतात लवकरच प्लास्टिकचं चलन?
सरकारनं 2000 रुपयांच्या नोटांचं चलन बंद केलं आहे. आरबीआयनं आता या नोटा परत घेतल्या आहेत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. या कागदी नोटांची गरज संपली होती. म्हणून सरकारनं त्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता भारतात लवकरच प्लास्टिकचं चलन येईल, असं लोकांना वाटू लागलंय.
प्लॅस्टिक चलन असणारे देश कोणते?
जगातल्या विविध देशांत कागदी चलन चालतं. तर अनेक देशांत प्लास्टिकचंही चलन अस्तित्वात आहे. यालाच पॉलिमर करन्सी असंही म्हटलं जातं. जगातल्या 23 देशांमध्ये प्लास्टिकचं चलन चालतं. या देशांनी त्यांच्या कागदी चलनाचं प्लास्टिकच्या चलनात रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या 23 देशांपैकी 6 देशांनी प्लास्टिक करन्सी पूर्णपणे लागू केलीय. पॉलिमर करन्सी असणारे काही देश पाहूया...
- ऑस्ट्रेलिया
- न्यूझीलंड
- ब्रुनेई
- व्हिएतनाम
- रुमानिया
- पापुआ न्यू गिनी
- कॅनडा
- मालदिव
- निकाराग्वा
- इंग्लंड
50हून अधिक देशांत प्लास्टिक चलन
नोव्हेंबर 2016ला भारतात नोटाबंदी झाली. तर त्याच्या थोडे दिवस आधी सप्टेंबर 2016मध्ये इंग्लंडमधलं चलन कागदावरून प्लास्टिकवर आणण्यात आलं. मात्र पॉलिमर नोटा जारी करणारा इंग्लंड काही पहिला देश नव्हता. साधारणपणे 40 वर्षांपूर्वी प्रथम प्लास्टिक नोटा जारी करण्यात आल्या होत्या. तर सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास 50पेक्षा जास्त देशांमध्ये पॉलिमर नोटा चलनात आहेत. येत्या काळात प्लास्टिकचे चलन आले तर त्यात कोणालाच नवल वाटणार नाही.
प्लास्टिक चलनाचे फायदे
कायदी चलन आणि प्लास्टिक चलनामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक जाणवतो. तज्ज्ञांनी यावर आपलं मत व्यक्त केलंय. या चलनाचे फायदे पाहता अनेक देशांत आता ते स्वीकारलं जातंय.
- कागदी चलनाची कॉपी करून बनावट नोटा तयार करणं खूप सोपं असतं. पण दुसरीकडे प्लास्टिकच्या चलनाची कॉपी करणं मात्र अवघड आहे.
- प्लास्टिक चलनात ओलावा राहण्याची तसंच घाण होण्याची शक्यता खूपच कमी असते. उच्च आर्द्रता आणि उच्च तापमान असलेल्या देशांसाठी अशा नोटा एक चांगला पर्याय ठरतो.
- कागदी नोटांपेक्षा प्लास्टिकचं चलन अधिक टिकाऊ असते.