Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

House Or SIP : स्वतःचे घर की एसआयपी? कशात गुंतवणूक केल्यास 10 वर्षांत मिळेल उत्तम परतावा? जाणून घ्या

House Or SIP

House Or SIP : गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. मग घरासाठी पैसा खर्च करावा की, त्याऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, असा ही प्रश्न काहींना पडतो. तर जाणून घेऊया, घर आणि SIP यापैकी कशात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.

House Or SIP : सामान्य माणसाच्या आयुष्यात 'स्वतःच घर' हा शब्दच खूप महत्वाचा वाटतो. प्रत्येकाचे स्वप्न हेच असते की, छोटं का होईना पण आपलं स्वतःच घर असावं. पण, जीवन जगत असतांना फक्त स्वतःचे घर असणेच महत्वाचे आहे की इतर गुंतवणूक सुद्धा तेवढीच महत्वाची ठरते. याबाबत अजूनही अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी गुंतवणूकदाराने अधिकृत वित्तीय सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करावी. तर जाणून घेऊया, घर आणि SIP यापैकी कशात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.

स्वतःचे घर घ्यायचे असल्यास…

घर घेण्याचा निर्णय कितपत योग्य असू शकतो, उदा. मेट्रो सिटीमध्ये 2BHK घराची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे. तिथे तुम्हाला 15 टक्के डाउनपेमेंट भरावे लागेल. म्हणजेच 6 लाख रुपये भरावे लागतील. रजिस्ट्री आणि घराच्या फिनिशिंगवरील खर्चामुळे ही रक्कम सुमारे 10 लाख रुपये होते. अशा प्रकारे, परवडणारे घर घेण्यासाठी तुमच्याकडे किमान 10 लाख रुपये असणे आवश्यक आहे. 

तुम्ही जर 30 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षासाठी घेतले तर तुम्हाला वार्षिक 9 टक्के व्याजाने होम लोनसाठी दरमहा सुमारे 25,000 रुपयांचा EMI भरावा लागेल.

म्हणजेच, तुमच्या 40 लाख रुपयांच्या घरासाठी तुम्हाला व्याजासह 60 लाख रुपये मोजावे लागेल आणि डाउनपेमेंटसाठी 0 लाख रुपये खर्च करावे लागेल. जर तुम्ही तुमच्या 10 लाख रुपयांच्या बचतीवर तुम्हाला 20 वर्षांसाठी मिळणाऱ्या 9 टक्के व्याजाची गणना कर्जाच्या कालावधीप्रमाणे केली, तर तुम्हाला 20 वर्षांनंतर 28 लाख रुपये फक्त साध्या व्याजावर मिळतील. आता तुम्हीच विचार करा की, 20 वर्षांनंतर तुम्ही तुमचे घर विक्रीस काढले तर ते 88 लाख रुपयाला कोणी खरेदी करणार का? 

SIP मध्ये गुंतवणूक केल्यास…

SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आजकाल गुंतवणुकीचा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. घराच्या डाउनपेमेंटसाठी जमा केलेले 10 लाख रुपये एका वेळेच्या SIP योजनेत गुंतवू शकता. जर आपण SIP मध्ये सरासरी 15 टक्के परतावा देखील काढला तर 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 10.5 वर्षात सुमारे 40 लाख रुपये मिळू शकतात.

म्हणजे तुमची गुंतवणूक सुमारे 10 वर्षांत 4 पट होऊ शकते? तुम्ही फक्त 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह 20 वर्षात 80 लाखांहून अधिकचे मालक होऊ शकता. तर तुमच्यावर EMI चा कोणताही बोजा वाढणार नाही, ज्यामुळे तुम्ही तुमचे इतर खर्च सांभाळू शकता. या दोन्ही पर्यायांपैकी एका पर्यायात गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदाराने अधिकृत वित्तीय सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करावी.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)