मागील काही वर्षांमध्ये देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजिटल पेमेंटने लोकांच्या आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. ग्रामीण भागातही रोखीने व्यवहार करण्याऐवजी नागरिक आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा देणाऱ्या अॅपचा वापर करून मोठ्या प्रमाणात व्यवहार करत आहेत. जगभरात (UPI)द्वारे व्यवहार करण्यात भारत हा अव्वल देश ठरला आहे. गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2023 पर्यंत रिटेल पेमेंटमध्ये UPI ने व्यवहार करण्याचा वाटा हा 73 % इतका होता. दरम्यान या पार्श्वभूमीवर UPI च्या माध्यमातून भारतातील डिजिटल पेमेंटचा वापर कशामुळे वाढला याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊ.
Table of contents [Show]
- काय आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)? : What is the UPI
- डिजिटल पेमेंटसाठी यूपीआयच्या वापरात मोठी वाढ-
- यूपीआय वापराचे फायदे Benefits of UPI
- सहज आणि सोपा व्यवहार: Simplified Transactions through UPI
- झटपट आणि रिअल-टाइम पेमेंट: Instant and real-time payments
- सुरक्षित व्यवहार : Secure Transaction
- विविध सेवांचे एकत्रीकरण
काय आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)? : What is the UPI
रोखीने व्यवहार करण्याऐवजी आता ऑनलाईन पद्धतीने पैशाचे व्यवहार केले जात आहेत. त्या व्यवहारासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस(UPI)या लोकप्रिय सुविधेचा वापर केला जातो. यूपीआय ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैशांची देवाण-घेवाण करता येणारी सुविधा आहे. 2016 पासून आरबीआय (भारतीय रिझर्व बँक) आणि NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. UPI प्रणाली वापरून ग्राहक कोणत्याही बँकेच्या खात्यासोबत सहज व्यवहार करू शकतो. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एकावेळी 10 रुपयांपासून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचे व्यवहार करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारख्या माहितीची गरज पडत नाही. या व्यवहारासाठी फक्त एका युजरनेमचा म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट अॅड्रेसचा (VPA)वापर केला जातो. UPI हा असा पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जो स्मार्टफोन किंवा फीचर फोनद्वारे सहज वापरता येऊ शकतो.
डिजिटल पेमेंटसाठी यूपीआयच्या वापरात मोठी वाढ-
भारतीय रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआय (RBI & NPCI) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 या आर्थिक वर्षात UPI च्या माध्यमातून एकूण झालेले व्यवहार हे 139.2 लाख कोटी इतके होते. फक्त 7 वर्षांच्या कालावधीत फक्त टियर 1 शहरांमध्येच नाही तर टियर 2 आणि 3 शहरांमध्ये UPIचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. थोडक्यात विचार केला तर असे लक्षात येते की ग्रामीण भागात देखील ज्यांच्याकडे अँड्राईड फोन आहे, तो डिजिटल पेमेंटच्या सुविधेला पसंती देत आहे. यूपीआयच्या माध्यमातून होत असलेली डिजिटल पेमेंटमधील वाढ यासाठी पुढील काही घटक कारणीभूत ठरू शकतात.
यूपीआय वापराचे फायदे Benefits of UPI
- युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) च्या वापरामुळे दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी करता येतात.
- नेट बँकिंग, चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,एटीएम यांचा वापर कमी होतो.
- आर्थिक व्यवहार करण्यासाठी रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- काही सेकंदात पैशाची देवाण-घेवाण करता येते.
- कोणत्याही बँक खात्यात सहज पैसे पाठवता येतात.
सहज आणि सोपा व्यवहार: Simplified Transactions through UPI
UPI ने एकाच प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन पेमेंट करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांचे बँक खाते UPI ला लिंक करून कोणत्याही बँक खात्यासोबत व्यवहार करता येत आहे. UPI च्या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून सहज आणि काही सेकंदात पैसे पाठवता अथवा प्राप्त करता येतात. नेट बँकिंगच्या तुलनेत UPI च्या माध्यमातून व्यवहार जलद गतीने करता येतात. हे जास्तीत जास्त नागरिकांना ग्राहकांना परवडणारे आणि सोप्या व्यवहाराचे माध्यम झाले आहे.
झटपट आणि रिअल-टाइम पेमेंट: Instant and real-time payments
UPI चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे झटपट आणि रिअल-टाइम पेमेंट करण्याची क्षमता, पारंपारिक पद्धतींच्या व्यवहारामध्ये पैशाचे हस्तांतरणास ठराविक कालावधी लागतो. मात्र UPI च्या माध्यमातून काही सेकंदात व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यवसाय,ऑनलाईन शॉपिंग,पैशाची देवाण-घेवाण इत्यादी व्यवहार झटपट आणि अधिक सोयीस्कर झाले आहेत.यामुळे होणाऱ्या बचतीमुळे देखील UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सुरक्षित व्यवहार : Secure Transaction
UPI च्या माध्यमातून व्यवहार झटपट आणि सोप्या पद्धतीने तर करता येतोच; मात्र या माध्यमातून केलेले डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवते. सुरक्षितेच्या दृष्टीने UPI चा टू-स्टेप व्हेरिफिकेशनने (TWO STEP VERIFICATION) प्रमाणित केले जातात. यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत असताना युजर्सना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन तसेच पिनकोडची पडताळणी केल्यानंतरच व्यवहार करता यतो. या व्यतिरिक्त ग्राहकाच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी UPI एनक्रिप्टेड तंत्रज्ञान वापरते. या सुरक्षा उपायांमुळे ग्राहकांचा डिजिटल पेमेंटवरचा विश्वास वाढला आहे आणि फसवणूक किंवा अनधिकृत व्यवहारांबद्दलची चिंतादेखील कमी झाली आहे.
विविध सेवांचे एकत्रीकरण
UPI एकाच प्लॅटफॉर्मवर विविध सेवा आणि व्यापक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जसे की तुम्ही यूपीआयचा वापर करून ऑनलाईन बिल पे करू शकता, ऑनलाईन शॉपिंग करता येते, चित्रपट, रेल्वे, विमान प्रवास यासाठी तिकीट बुकिंग करू शकता. थोडक्यात व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांसाठीही यूपीआय प्रणाली सर्वाधिक पसंतीस उतरल्याचे सध्याच्या वाढत्या डिजिटल व्यवहाराच्या आकडेवारी स्पष्ट होते आहे. त्यामुळेच भारतातील डिजिटल पेमेंटच्या वाढीला चालना मिळत आहे.