Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाइन पीएफ- घरबसल्या ठेवा खात्यावर लक्ष

ऑनलाइन पीएफ- घरबसल्या ठेवा खात्यावर लक्ष

ईपीएफओ खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजाचे आकलन करायचे असेल तर घरबसल्या सहजपणे त्याची पडताळणी करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ खात्यात साडे आठ टक्के दराने व्याज जमा होत असते. या जमा झालेल्या व्याजाचे आकलन करायचे असेल आणि व्याज किती जमा झाले आहे, हे तपासायचे असेल तर घरबसल्या सहजपणे त्याची पडताळणी करता येते.  खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी ईपीएफ पासबुकची पडताळणी करण्यासंदर्भात ऑनलाईन अनेक सुविधा उपलब्ध आहेत. 

मिस कॉलने बॅलेन्स तपासा

ईपीएफओने आपल्या लाभार्थ्यांना ईपीएफ खात्याचे बॅलेन्स पाहण्यासाठी मिस कॉलची सुविधा दिली आहे. आपल्याला ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहवयाची असेल तर, नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या माध्यमातून माहिती मिळवू शकता. 22901406 वर मिस कॉल देऊ शकतो. कॉल करताच ईपीएफओकडून लिंक मोबाईल नंबरवर मेसेज येईल आणि त्यात आपल्याला एकूण शिलकीची माहिती दिली जाईल.

‘एसएमएस’च्या आधारे माहिती मिळवा

मिस्ड कॉलच्या माध्यमातून बॅलेन्स जाणून घ्यायचे नसेल तर ‘एसएमएस’च्या मदतीने देखील ईपीएफ खात्याचे बॅलेन्स जाणून घेऊ शकता. यासाठी ईपीएफ खात्याशी संलग्न मोबाईल नंबरने एक एसएमएस 7738299899 वर पाठवावा लागेल. या संदेशात आपल्याला ‘इपीएफओएचओ यूएएन इएनजी’ असे लिहून पाठवावे लागेल. मेसेज पाठवताच नोंदणीकृत मोबाईल नंबरवर खात्याचे बॅलेन्स पाठवले जाईल. ईपीएफओकडून हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांतून देखील मेसेज पाठवण्याची सुविधा आहे. यासाठी मेसेजमध्ये आपल्या भाषेसाठी सांकेतिक शब्द लिहावे लागतील. उदा. इएनजी या शब्दाचा अर्थ असा की, आपल्याला इंग्रजीत मेसेज हवा आहे.

उमंग अॅपवरही सुविधा

सरकारने ईपीएफओशी निगडीत सर्व सेवा उपंग अॅपवर देण्याचे निर्देश दिले आहेत. ईपीएफओने उमंग अॅपवरही ईपीएफओ खात्याचे बॅलेन्स तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ‘उमंग’वर ईपीएफओच्या बटनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक पेज सुरू होईल. त्यात एम्प्लॉय सेंट्रिक सर्व्हिस नावाने एक बटन असेल. यावर क्लिक करताच यूएएन आणि पासवर्ड नमूद करावा लागेल. पासवर्डऐवजी ओटीपीच्या पर्यायाचा वापर केल्यास लिंक मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी दिल्यानंतर आपल्यासमोर ईपीएफ खाते दिसू लागेल. त्यानुसार बॅलेन्स सहजपणे पाहू शकता. पीएफ खात्यात मागील आर्थिक वर्षाचे व्याजही पाहू शकता.

पोर्टलचाही वापर

ईपीएफओ खात्याचा बॅलेन्स तपासण्यासाठी कोणताही लाभार्थी हा ईपीएफओच्या पोर्टलचा लाभ घेऊ शकतो. या पोर्टलवर आपल्या यूएएनच्या माध्यमातून लॉग इन करून ईपीएफ खात्याशी निगडीत सर्व माहिती मिळवू शकतो. पोर्टलच्या माध्यमातून खात्याची स्थिती जाणून घेऊ शकता. खात्यातून कधी, केव्हा आणि किती रक्कम काढली, याचेही विवरण पाहता येते.  दरवर्षी जमा होणार्या व्याजाचीही माहिती असते. ई-पासबुकमध्ये मागील आर्थिक वर्षाचे किंवा त्यापूर्वीच्या वर्षाचे व्याजही पाहू शकता.

लिंक असलेले बँक खाते ठेवा अपडेट

ईपीएफ खात्यातून काही रक्कम काढू इच्छित असाल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईपीएफ खात्याशी लिंक्ड असलेले बचत खाते अपडेट असणे गरजेचे आहे. आपले जुनेच खाते ईपीएफओ खात्याला जोडलेले असेल आणि ते सध्या सक्रिय नसेल तर पैसे मिळवण्यासाठी नवीन खात्याला तात्काळपणे ईपीएफओशी लिंक करावे लागेल. ही कृती आपण घरबसल्या सहजपणे ऑनलाइनही करू शकता.