Fi Money Launched Instant Personal with Zero Pre-Closure Charges: ऑनलाईन मनी मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म एफआय मनीने (Fi Money) झटपट क्रेडिट देण्यासाठी फेडरल बँकेशी भागीदारी केली आहे. ज्यामुळे एफआय मनीद्वारे (Fi Money) ऑनलाईन इंस्टंट कर्ज सेवा घेणे सोप्पे होणार आहे. लांबलचक कागदपत्रे, पूर्व-मंजुरी अर्ज प्रक्रिया न करता झटपट वैयक्तिक कर्ज ग्राहकांना मिळणार आहे. 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम मंजूर केले जाणार आहेत. ही सेवा लवकरच टप्प्याटप्प्याने एफआय मनीच्या (Fi Money) प्लॅटफॉर्म सुरू होणार आहे, असे एफआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कर्ज घेणे आता सोपे झाले! (Borrowing is now easy)
भारतातील बँक कर्जाची मागणी 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. दुसरीकडे, ठेवींच्या बाबतीत, वेग खूपच मंद झाला आहे. यामुळेच देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयने कर्जाची वाढती मागणी आणि ठेवींचा वेग आणि बँकिंग व्यवस्थेचा ताळेबंद यातील तफावतीवर चिंता व्यक्त केली आहे. बँका कर्जाचे अर्ज दीर्घकाळ लटकत ठेवतात, बहुतांश कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांचे अर्ज नाकारले जातात, यासाठी फेडरल बँकेने आणि एफआय मनीशी भागीदारी केली आहे. जेणेकरून सर्वच ग्राहकांना कर्ज देता यावे.
एफआय मनी (Fi Money), एक बेंगळुरू आधारित फिनटेक (fintech) कंपनी, तिच्या झटपट कर्ज सेवेद्वारे कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे कर्ज अर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ खूपच कमी आहे. या सेवेमध्ये, कर्जाची रक्कम थेट कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकाच्या एफआय़-फेडरल (Fi-Federal) बचत खात्यात हस्तांतरित केली जाईल आणि कर्जदाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी वापरला जाऊ शकतो.
निधीच्या वापरावर कोणतेही बंधन नसेल (no restrictions on the use of funds)
एफआय मनीच्या (Fi Money) एका विधानानुसार, एफआय मनीच्या झटपट क्रेडिट योजनेवर नो-क्वेश्चन आस्क (No Question Ask) म्हणजे, प्रश्न न विचारण्याचे धोरण लागू आहे. हेच कारण आहे की ग्राहक कर्जाची रक्कम कोणत्याही कारणासाठी वापरू शकतो आणि शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत जसे दिसते तसे एफआय मनीच्या भागावर कोणताही आक्षेप घेतला जाणार नाही. या सेवेची एक खास गोष्ट म्हणजे प्री-क्लोजर फी नाही, म्हणजेच कर्जदाराने कर्जाच्या मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केली तर त्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, म्हणजेच एफआय मनी त्या ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही.
एफआय मनीचे सह-संस्थापक आणि संचालक सुजित नारायणन म्हणाले की, या सेवेचा उद्देश आमच्या ग्राहकांना जेव्हा कधीही पैशांची गरज असेल, तेव्हा त्यांना त्वरित आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. कर्जासाठी अर्ज करताना कर्जदारांना लांबलचक कागदपत्रे आणि अर्जाच्या किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते, ही कीचकट प्रक्रियेतून ग्राहकांना जावे लागू नये म्हणूनही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.