सुमेध आज भलताच खुशीत होता नोकरीला एक वर्ष पूर्ण होत असतांनाच आज त्याने स्वतःसाठी फोर व्हिलर घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी पहिल्यांदाच कर्ज काढणार असल्याने जुजबी चौकशीसाठी तो बँकेत गेला होता.
लोन काउंटर जवळ येऊन सुमेधने व्हेईकल लोनसाठी प्रोसेस करण्याचे बँक कर्मचाऱ्यास सांगितले. बँक कर्मचाऱ्याने संबंधित प्रक्रिया सुरू करायला घेताच पुढच्याच क्षणी, "तुम्ही तुमच्या आधीच्या दोन कर्ज प्रकरणात डिफॉल्टर असल्या कारणाने तुमचे हे लोन पास होऊ शकत नाही" असे सांगितले. आयुष्यात पहिल्यांदाच कर्ज घेण्यासाठी आलेल्या सुमेधचे दोन बुडीत कर्ज प्रकरणांबद्दल ऐकून धाबेच दणाणले. संपूर्ण चौकशीअंती सुमेधच्या नावावर दुसरेच कोणी कर्ज घेतले असून हे 'फ्रॉड' प्रकरण असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसात जाणे, तक्रार दाखल करणे या सर्व गोष्टी झाल्या परंतु या सर्व प्रकरणात सुमेधला मात्र प्रचंड मनस्ताप झाला.
या प्रकरणामुळे निराश झालेल्या सुमेधला वडिलांनी इथून पुढे अशा गोष्टी होऊ नये यासाठी आपल्या Financial Adviser (वित्त सल्लागार )असलेल्या मित्राकडे जाण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या आग्रहाखातर सुमेध त्यांना भेटला. वित्त सल्लागारांनी त्याला विविध प्रकारचे फ्रॉड, त्यासाठी तयार केली जाणारी फेक कागदपत्रे यांविषयी बरीच माहिती दिली. एक एक नवनवीन माहिती ऐकून सुमेध तर आवाकच झाला. त्यानंतर त्यांनी फ्रॉडपासून वाचण्यासाठी विविध सतर्कतेचे उपाय सुचवतानाच 'वन स्कोअर ॲप' या फायनान्शियल ॲपची माहिती सुमेधला दिली.
काय आहे ‘वन स्कोअर ॲप’
वन स्कोअर (One Score) ॲप हा मुलतः क्रेडिट स्कोअर मॅनेज करण्यासाठीचा ॲप आहे. हे ॲप क्रेडिट स्कोअर मॅनेज करतानाच ते बिल्ड करायला तर मदत करतेच शिवाय तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये काही drop (घट )आल्यास तुम्हाला notify ( सुचित करणे ) करतो. या सुविधेमुळे तुमच्या अकाउंटवर काही 'फेक लोन' सारखे गैरप्रकार घडत असल्यास तुम्हाला रिपोर्ट येतो.
नक्की कसे काम करते ‘वन स्कोअर ॲप’
या ॲप मध्ये तुमचे क्रेडिट स्कोअर काउंट करून दाखविले जाते. 'आयडियल क्रेडिट स्कोअर' किती असला पाहिजे याची माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे पेमेंट वेळेवर केले आहे की लेट झाले आहे. याचा तुमच्या Cibil Score ( सिबिल स्कोअर )वर काय परिणाम झाला आहे. याची माहिती या ॲपमधून मिळते. 'क्रेडिट लिमिट' किती वापरले गेले आहे. आपला क्रेडिट
स्कोअर improve करण्यासाठी (मर्यादा वाढवण्यासाठी) कुठले विविध ऑप्शन्स आहेत, याची देखील माहिती दिली जाते. Due payment (देयक रक्कम)साठीचे रिमाइंडर दिले जाते. तसेच अर्थतज्ञांमार्फत 'ideal score situation ' सांगितली जाते.
काय काळजी घ्यायला हवी
- आपला बँक अकाउंट नंबर किंवा आधार कार्ड नंबर कधीही शेयर करू नये.
- काही महत्वाच्या कामासाठी वरील नंबर शेयर करायची वेळ आल्यास समोरील स्रोत अधिकृत असल्याची खातरजमा करावी.
- लोन घेतलेले असल्यास किंवा क्रेडिट कार्डचा वापर केलेला असल्यास त्याचे पेमेंट, इंस्टॉलमेंट वेळेवर होतील हे बघावे.
- आपला सिबिल स्कोअर मेंटेन राहील हे बघावे.
- सिबिल स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घ्यावा.
- एखाद्या अधिकृत ॲपच्या माध्यमातून आपला सिबिल स्कोअर,फायनान्शिअल सिच्युएशन यावर लक्ष ठेवावे.