Gold Mortgage Loan: आजही भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने (Gold Jewellery) खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. सोन्याचे दागिने खरेदी करण्यात प्रामुख्याने महिलांचा पुढाकार असायचा. पण आता यात पुरुषही मागे नाहीत. बऱ्याचवेळा सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यामागे हौस हा भाग महत्त्वाचा असायचा. पण गुंतवणुकीतून अडचणीच्या काळात लगेच रोख पैशांची मदत मिळवता येते. त्यामुळे सुवर्ण तारण कर्जाला मोठी मागणी आहे.
अनेक बँका सोने तारण ठेवून कर्ज उपलब्ध करून देतात. त्याबदल्यात बँका अगदी कमीत कमी व्याजदर आकारतात. त्यामुळेच बहुसंख्य लोक कर्ज घेताना सोने तारण ठेवून कर्ज घेतात. हा एक प्रकारचा सुरक्षित कर्ज घेण्याचा पर्याय मानला जातो. कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवण्यात आलेले दागिने परत मिळतात.
Table of contents [Show]
सुवर्ण तारण कर्जाची वैशिष्ट्ये
सध्याच्या घडीला अनेक सरकारी आणि खासगी बँका सोने तारण ठेवून कर्ज उपलब्ध करून देतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा शैक्षणिक, वैद्यकीय आणीबाणीसारख्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सुवर्ण तारण कर्ज (Gold Mortage Loan) हा एक उत्तम पर्याय आहे. बँक किंवा वित्तीय संस्थेकडे तारण ठेवलेले सोने हे सुरक्षित राहते. महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी किमान 3 महिन्यांपासून ते कमाल 48 महिन्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मासिक आधारावर ठराविक हप्ता कर्जदारासाठी बँक निश्चित करते. ज्यामुळे त्याची सहज परतफेड करणे शक्य होते.
पात्रतेचे निकष काय?
तुम्हाला देखील सुवर्ण तारण कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला बँकेचे काही निकष पूर्ण करावे लागतील. हे निकष प्रत्येक बँकेनुसार किंवा वित्तीय संस्थेनुसार वेगवेगळे असू शकतात.पात्रते संदर्भातील अधिकृत माहिती बँकेच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. प्रामुख्याने सुवर्ण तारण कर्ज घेण्यासाठी 18 वर्ष वयोमर्यादा पूर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच तारण ठेवण्यात येणारे दागिने हे 18 कॅरेट किंवा त्यापेक्षा जास्त कॅरेटचे असावेत. दागिने किती कॅरेटचे आहेत; त्यानुसार कर्जाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय अर्जदार हा क्रेडिट प्राप्त असावा लागतो.
सर्वसाधारण व्याजदर किती?
उपलब्ध माहितीनुसार, सुवर्ण तारण कर्जावर प्रत्येक बँका किंवा वित्तीय संस्था वेगवेगळे व्याजदर आकारतात. कमीत कमी 7 टक्क्यापासून व्याजदर सुरु होऊन तो जास्तीत जास्त 27 टक्क्यांपर्यंत आकारण्यात येतो.
नामांकित बँकांचे व्याजदर जाणून घ्या
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सुवर्ण तारण कर्जा अंतर्गत 7.30 ते 7.70 टक्के व्याजदर आकारते
- एचडीएफसी बँक (HDFC Bank) सुवर्ण तारण कर्जावर 11 ते 16 टक्के व्याजदर आकारते
- मुथूट गोल्ड लोन (Muthoot Gold Loan) अंतर्गत सुवर्ण तारण कर्जावर 11.9 ते 27 टक्के व्याजदर आकाराला जातो.
- अॅक्सिस बँक (Axis Bank) ग्राहकांकडून 14 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारते
- तर कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सुवर्ण तारण कर्जावर 8 ते 17 टक्के व्याजदर आकारते
Source: bankbazaar.com