Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cabinet Decision: दिवळीत शंभर रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Anandacha Shidha in 100 Rupees

Image Source : www.twitter.com/CMOMaharashtra

Cabinet Decision: राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी रेशनकार्डधारक अशा 1.66 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने दिवळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. लाभार्थ्यांना या आनंदाच्या शिध्यामध्ये रवा, चनाडाळ, साखर, खाद्यतेलासोबतच मैदा आणि पोहेदेखील मिळणार आहेत.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

आनंदाचा शिधा

राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो चना डाळ, मैदा आणि पोहे असे जिन्नस शंभर रुपयात दिले जाणार आहेत. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वितरित केला जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने 530 कोटी 19 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली.