Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ola Lay off: Ola मधून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

Ola

Image Source : www.indiatvnews.com

ओलामधील कर्मचारी कपात (Ola Lay off) ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग असून नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.

कर्मचारी कपात: अनेक कंपन्यांमध्ये या नवीन वर्षात कर्मचारी कपात होताना दिसते आहे. Amazon पाठोपाठ आता ऑनलाइन कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म Ola मध्ये देखील कर्मचारी कपात केल्याचे निदर्शनास आले आहे. ओलाने आपल्या टेक (Tech) आणि प्रोडक्ट (Product) टीममधील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ओला आपल्या टीममध्ये मोठे बदल करत आहे, ज्याचा सर्वात जास्त परिणाम अभियांत्रिकी विभागात (Engineering Department) दिसून येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या बदलाचा एक भाग म्हणून, कंपनीने ओला कॅब्स (Ola Cabs), ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आणि ओला फायनान्शियल सर्व्हिसेस (Ola Financial Services) मधील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.    

ओलामध्येही नवीन भरती सुरूच राहणार   

ओलामधील कर्मचारी कपात ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग आहे असे कंपनीने म्हटले आहे. मात्र,नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कंपनी वेळोवेळी अंतर्गत बदल करत असते, ही कर्मचारी कपात त्याचाच एक भाग असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, अभियांत्रिकी आणि डिझाइन विभागात नवीन नियुक्ती सुरू राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच वरिष्ठ पदांवरही येत्या काळात भरती होणार असून ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढले जात आहे, त्यांना त्यांच्या नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असेही कंपनीने म्हटले आहे.    

आतापर्यंत ola मध्ये काय घडलं?    

ओला गेल्या वर्षभरापासून कॉस्ट कटिंग (Cost Cutting) करत आहे. या अंतर्गत कंपनीने मागच्या वर्षी देखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. एवढेच नाही  तर इन्फोटेनमेंट सेवा (Ola Play), सेकंड हँड कार प्लॅटफॉर्म (Ola Cars)आणि क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ओला डॅश (Ola Dash)देखील बंद केली आहे. फंडिंग आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स (Micro Economics) समोरील आव्हानांमुळे भारतीय स्टार्टअप्ससाठी मागील वर्ष आव्हानात्मक होते. त्यामुळे कंपन्यांचे छोटेखानी युनिट बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी, भारतीय स्टार्टअप्सनी 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.यावर्षी देखील या परिस्थितीत बदल होताना दिसत नाहीये.