Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OLA Hyperchargers : ओलाच्या ग्राहकांना मिळणार 100 हायपरचार्जर्सची सुविधा मोफत

OLA Hyperchargers : ओलाच्या ग्राहकांना मिळणार 100 हायपरचार्जर्सची सुविधा मोफत

OLA Hyperchargers : ओलाच्या इलेक्ट्रिक बाइक्स वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओलातर्फे लवकरच हायपरचार्जर्स बसवले जाणार आहेत. ही सुविधा कर्नाटक राज्यातल्या बेंगळुरू या शहरातल्या वाहनधारकांसाठी ओलानं उपलब्ध करण्याचं ठरवलंय.

इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशाप्रकारची वाहनं निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाही मोठा फायदा होतोय. वाहनासह सेवा-सुविधा पुरवणं हेदेखील या कंपन्यांचं कर्तव्य आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे चार्जिंग स्टेशन्स. ओला या इलेक्ट्रिक वाहननिर्मिती करणाऱ्या कंपनीनं आता आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी तब्बल 100 हायपरचार्जर्स (Hyperchargers) उभारणार असल्याचं जाहीर केलंय. बेंगळुरू (Bengaluru) शहरात ही स्टेशन्स उभारली जाणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीनं ही घोषणा केलीय. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यापासून 15 मिनिटांच्या अंतरावर हे हायपरचार्जर असतील, असा कंपनीनं दावा केलाय.

ग्राहकांची चार्जिंगच्या त्रासापासून सुटका

ओलाच्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. ओला एस 1 (OLA S1) इलेक्ट्रिक स्कूटर असणाऱ्या ग्राहकांची चार्जिंगच्या त्रासापासून सुटका होणार आहे. सध्या ओला एस 1(OLA S1) आणि ओला एस 1 प्रो (OLA S1 Pro) ग्राहकांना आपली स्कूटर हायपरचार्ज पूर्णपणे मोफत करता येणार आहे. कंपनीनं जरी याबाबतची घोषणा केलेली असली तरी सर्व शहरभर ते कधीपर्यंत बसवले जातील, याबाबत मात्र स्पष्टता नाही.

शहराच्या कानाकोपऱ्यात मिळणार सुविधा

ओलाचं मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला 100 हायपरचार्जर्स शहरातच्या ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले जातील. कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर सध्या भर देत आहे. व्यवसायवाढीसह आपल्या ग्राहकांना सेवा-सुविधा पुरवणं या बाबींना आम्ही प्राधान्य देत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. आता 100 हायपरचार्जर्स उभारणार असलो तरी भविष्यकाळात शहराच्या कानाकोपऱ्यात ते उपलब्ध करून दिले जातील, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केलाय.

15 मिनिटांत 50 किलोमीटरची रेंज 

ओलातर्फे विविध इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध करून देण्यात आल्यात. त्यापाठोपाठ इलेक्ट्रिकची हायपरचार्ज सेवा एक उत्तम सेवा आहे. 15 मिनिटांत ती 50 किलोमीटरची रेंज कव्हर करते. सध्या मर्यादित कालावधीसाठी ओला एस 1 आणि एस 1 प्रो ग्राहकांसाठी चार्जिंग मोफत असणार आहे. कंपनीनं डीसी फास्ट चार्जिंगचा दावा केलाय. MoveOS 3चे यूझर्स ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिजिटल कन्सोलवर हायपरचार्जचं ठिकाण शोधू शकतात. यासोबतच ओला अॅपवरदेखील तुम्ही तुमच्या चार्जिंग स्टेटसचं रिअल टाइम पाहू शकता.

पोर्टेबल चार्जरही मिळणार

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. यात ओलाचा वाटाही वाढतोय. ओला इलेक्ट्रिकचे जवळपास 2 लाख यूझर्स किंवा ग्राहक आहेत. तर सध्या कंपनीतर्फे हायपरचार्ज सुविधा फक्त ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रोसाठीच उपलब्ध असणार आहे. दुसरीकडे ओला एस 1 एअर (OLA S1 Air) ग्राहकांना केवळ एसी (AC) चार्जिंगच्या माध्यमातूनच चार्ज करता येणार आहे. या हायपरचार्ज नेटवर्कच्या व्यतिरिक्त ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रोसोबत 750Wचा पोर्टेबल चार्जरही मिळणार आहे. त्यासोबतच ओला एस 1 एअरसोबत 500Wचा पोर्टेबल चार्जर दिला जाणार आहे. हे दोन्ही युनिट्स स्लो चार्जिंगला सपोर्ट करतात.