Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NPS Balance : एनपीएसमधील बॅलन्स ऑनलाईन कसा पाहायचा

NPS Balance : एनपीएसमधील बॅलन्स ऑनलाईन कसा पाहायचा

Image Source : www.slideshare.net

गुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळत रहावे आणि त्यांच्या गुंतवणुकीवर लक्षणीय परतावा मिळावा, हे एनपीएसचे (National Pension Scheme) मुख्य उद्दीष्ट आहे. एनपीएस खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करा.

नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension Scheme) हा भारतातील एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. ज्याचा वापर करून तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता, तसेच तुमच्या संपत्तीत वाढ करू शकता आणि शेवटी सेवानिवृत्तीसाठी एक चांगली रक्कम उभी करू शकता . एखादी व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यावर त्याला रिटायरमेंटचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखावह जगता येईल आणि त्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देणं, हे नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) चे मूलभूत उद्दिष्ट आहे. एनपीएस खात्यातील पैसे दोन पद्धतींनी निर्धारित केले जातात. सर्वप्रथम खातेदार स्वेच्छेने त्यात प्रत्येक वर्षी काहीतरी योगदान देत असतो आणि दुसरे म्हणजे वार्षिक रकमेपैकी 40 टक्के गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न.

नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे काय? What is NPS?

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही एक सरकार पुरस्कृत सेवानिवृत्तीची योजना आहे. ज्यांना नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळत नाही. त्यांच्यासाठी ही योजना सरकार राबवत आहे.
एनपीएस योजनेनुसार, प्रत्येक वर्षी, सेवानिवृत्त होईपर्यंत, एखाद्या व्यक्तीने एनपीएस खात्यामध्ये किमान 1 हजार रूपये गुंतवले. तर गुंतवलेल्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम ही निवृत्तीनंतर काढून घेऊ शकतो आणि उरलेली 40 टक्के रक्कम निवृत्तीनंतरच्या उत्पन्नासाठी, वार्षिक खरेदीसाठी शिल्लक ठेवू शकतो.

एनपीएसमधील बॅलन्स कसा पाहायचा? How to check NPS balance?

एनपीएस खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या पद्धतीचा वापर करा.
सर्वप्रथम एनएसडीएलच्या https://cra-nsdl.com/CRA/ वेबसाइटवर जा.            
लॉग-इन करण्यासाठी युझर आयडी (USER-ID) म्हणून तुमचा परमनंट रिटायरमेंट अॅलॉटमेंट नंबर (PRAN) नंबर आणि पासवर्ड टाका.
आता ट्रान्सॅक्शन स्टेटमेंट टॅब निवडा.
होल्डिंग स्टेटमेंट बटणावर क्लिक करा.
इथे तुमची जमा झालेली नॅशनल पेन्शन स्कीममधील शिल्लक रक्कम पाहू शकाल.

उमंग अॅपद्वारे एनपीएसमधील बॅलन्स चेक करा

उमंग हा विविध सरकारी सेवा आणि योजनांसाठी एकच ई-गव्हर्नन्स सेवा देणारा सरकारी उपक्रम आहे. उमंग सेवा या वेबसाईटवरून तुम्ही हव्या असलल्या सेवेचा लाभ घेऊ शकता. तर उमंग अॅप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. उमंग अॅपवर लॉग-इन करून एनपीएसशी संबंधित सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.