SBI Special Offer About PPF: पीपीएफमधील गुंतवणूक सुरक्षित आहे, म्हणून अनेकजण त्यात पैसे गुंतवत असतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा हा एक सुरक्षित मार्ग आहे. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. पीपीएफ गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. या योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे, जे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. एसबीआयचे ग्राहक आता त्यांच्या इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग सेवेद्वारे पीपीएफ खाते ऑनलाइन घरी बसूनही उघडू शकतात. यासाठी काय प्रक्रिया आहे, ते जाणून घेऊया.
ही प्रक्रिया फॉलो करा
- तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने SBI खात्यात ऑनलाइन लॉग इन करा.
- उजव्या बाजूला 'Request and enquiries' असे ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा.
- ड्रॉपडाउन मेनूमधून नवीन पीपीएफ खाती वर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
- नवीन पेजवर तुमचा पॅन नंबर आणि इतर तपशील टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे पीपीएफ खाते उघडायचे असलेल्या शाखेचा कोड टाका.
- पत्ता आणि नावनोंदणी क्रमांक यासारखे तुमचे सर्व वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि पुढे जा वर क्लिक करा.
- सबमिशन केल्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला आहे, असे सांगणारा डायलॉग बॉक्स दिसेल.
- आता तुम्हाला दिलेल्या संदर्भ क्रमांकासह फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
- 'Print PPF ऑनलाइन अॅप्लिकेशन' ऑप्शन वरून खाते उघडण्याचा फॉर्म प्रिंट करा आणि KYC कागदपत्रे आणि छायाचित्रांसह 30 दिवसांच्या आत फॉर्म शाखेत सबमिट करा.
- आधार क्रमांक SBI बचत खात्याशी जोडलेला असावा.
- तुमचा आधार क्रमांक तुमच्या SBI बचत खात्याशी जोडलेला असावा. तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या आधारशी लिंक आहे तो देखील अॅक्टिव असावा.
गुंतवणुकीची किमान आणि कमाल मर्यादा
पीपीएफ खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक 500 रुपये आहे. तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता.
मुदतवाढ करणे शक्य
PPF खाते 15 वर्षांत परिपक्व (Matured) होते. त्यानंतर ते 5-5 वर्षांसाठी वाढवता येईल. पीपीएफ खाते उघडल्यानंतर 5 वर्षांपर्यंत या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. तथापि, जर तुम्ही 15 वर्षापूर्वी पैसे काढले तर तुमच्या फंडातून 1% कपात केली जाईल.
PPF खाते कोणतीही व्यक्ती कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत आपल्या नावाने हे खाते उघडू शकते. तर SBI बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरु केली आहे. एसबीआयचे ग्राहक आता त्यांच्या इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग सेवेद्वारे पीपीएफ खाते ऑनलाइन घरी बसूनही उघडू शकतात.