रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या 46 व्या एजीएममध्ये जियो एअर फायबरची घोषणा केली होती. हे डिव्हाईस प्रत्यक्षात बाजारामध्ये गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी दाखल होणार आहे. या डिव्हाईसच्या माध्यमातून 5G नेटवर्क आणि वायरलेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लाखो भारतीयांना वायरलेस ब्रॉडबँडचा फायदा होणार आहे.
रिलायन्सच्या वार्षिक मिटिंगमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जियो एअर फायबरला भारतातील 20 कोटी घरे आणि ऑफिस यांमध्ये पोहचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अंबानी म्हणाले भारतात दररोज 1.5 लाख कनेक्शन्स जोडले जाऊ शकतात आणि या हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे डिजिटल ट्रांन्सफॉर्मेशन च्या दिशेने भारतात एक मोठी क्रांती येईल. वायरलेस कनेक्शन्समुळे केबल च्या माध्यमातून कनेक्शन्स घेण्याची गरज नाही लागणार.
जियो एअर फायबर म्हणजे काय?
जियो एअर फायबरमध्ये युजर्सना ब्रॉडबँड सारख्या हायस्पीडचा फायदा केबल किंवा वायरविना मिळेल. युजर्सना थेट जिओ एअर फायबरला प्लग इन करावे लागेल आणि Wifi हॉटस्पॉट सारखे अनेक डिव्हाईस वर जबरदस्त 5G इंटरनेटचा फायदा युजर्सना भेटेल.
1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड
नवीन जियो एअर फायबर सेवा अगदी Wifi सारखीच काम करणार आहे. जसे WiFi हॉटस्पॉट आपण करतो तसेच ही सेवा देखील तितकीच पोर्टेबल असणार आहे. एका छोट्या स्पीकर एवढे हे डिव्हाईस असेल. यामुळे यामध्ये कनेक्टिव्हिटी रेंज संदर्भातील कोणत्याही प्रकारची समस्या क्वचितच येण्याची शक्यता आहे. मार्केट मध्ये चर्चा चालू आहे या डिव्हाईसला WiFi 6 या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट असेल.
ग्रामीण भागातील युझर्सना प्रामुख्याने होणार फायदा
भारतातील बर्याच भागांमध्ये अनेक गावं आहेत जेथे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी अजुनही पोहचलेली नाही. अशा गावांमध्ये राहणार्या लोकांना जियो एअर फायबर मुळे आता हाय स्पीड 5G इंटरनेट चा फायदा घेता येईल. या डिव्हाईस मध्ये 5G सिम कार्ड टाकावे लागतील व हे डिव्हाईस Jio True 5G इकोसिस्टम चा एक भाग असेल. याचे अनेक प्रकार आणि रिचार्ज प्लॅन मार्केटमध्ये 19 सप्टेंबर 2023 नंतरच दाखल होतील, असे बोलले जाते.