Income Tax Budget 2023: असेसमेंट वर्ष 2024-25 मध्ये नवीन टॅक्स प्रणाली अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) भरणाऱ्या वैयक्तिक टॅक्स पेअर्सना 7 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. नुकत्याच संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात (Indian Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman, Finance Minister, GOvt of India) यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत 3 लाखापर्यंत टॅक्स माफ आणि टॅक्स रिबेटची मर्यादा 5 लाखावरून 7 लाख रुपये केली. या नवीन टॅक्स रिबेटचा फायदा सुमारे 4.1 कोटी वैयक्तिक टॅक्स पेअर्सना होऊ शकतो.कारण असेसमेंट वर्ष 2021-22 मध्ये सुमारे 4.1 कोटी वैयक्तिक टॅक्स पेअर्सनी आपले उत्रन्न 5 लाख रुपयांपर्यंत असल्याचे जाहीर केले होते.
पगारदार आणि पेन्शनरांसाठी नवीन टॅक्स प्रणालीनुसार 50,000 रुपयांपर्यंतची वजावट लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 7.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींचे कर दायित्व हे असेसमेंट वर्ष 2024-25 पासून शून्य असणार आहे. पण नरेंद्र मोदी सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या टॅक्स सवलतीचा किती जणांना फायदा होणार आहे? हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. चला तर याची आकडेवारी काय सांगते ते आपण पाहू.
असेसमेंट वर्ष 2020-21 आणि 2021-22 मधील वैयक्तिक टॅक्स पेअर्स | ||
वैयक्तिक इन्कम टॅक्स (रुपये) | असेसमेंट वर्ष 2020-21 | असेसमेंट वर्ष 2021-22 |
0-5 लाख | 4,63,27,410 | 4,11,60,543 |
5 ते10 लाख | 1,12,28,574 | 1,40,74,602 |
10 लाखांहून अधिक | 54,11,934 | 81,03,067 |
स्त्रोत: लोकसभेमध्ये 13 फेब्रुवारी, 2023 रोजी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरातील आकडेवारी |
सरकारने या माहितीत 0 ते 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या व्यक्तींची नेमकी संख्या जाहीर केलेली नाही. पण असेसमेंट वर्ष 2024-25 पासून 0 ते 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स न लावण्याच्या नियमाचा लाभ अंदाजित 4 कोटीहून अधिक करदात्यांना होऊ शकतो. या टॅक्स पेअर्सना असेसमेंट वर्ष 2024-25 मध्ये, जर त्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त नसेल तर त्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. (Income Tax Slab for 2022-23)
सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 होती. त्यामुळे असेसमेंट वर्ष 2022-23 (आर्थिक वर्ष 2021-22)साठीची करदात्यांची उत्पन्ननिहाय आकडेवारी अजून गोळा करण्यात आलेली नाही.
इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, असेसमेंट वर्ष 2022-23 मध्ये 7,54,79,837 इतके आयटीआर (Income Tax Return-ITR) भरले गेले. त्यातील 7.19 कोटी आयटीआरची पडताळणी करण्यात आली. तर 12 फेब्रुवारी, 2023 पर्यंत 6.96 कोटी आयटीआर प्रोसेसमध्ये आहेत.