केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 फेब्रुवारी 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. यात नवीन कर प्रणाली मूलभूत पर्याय म्हणून जाहीर करण्यात आली. नवीन कर प्रणालीत 7 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले. तसेच जुन्या कर प्रणालीप्रमाणेच नवीनसाठी 50000 रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शनची सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री सीतरामन यांनी केली. नवीन कर प्रणालीत अर्थमंत्र्यांनी कर स्तर बदलले आहेत. त्यानुसार टॅक्स कॅलक्युलेटरमध्ये देखील बदल केला आहे.
असेसमेंट इयर 2023-24 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये करण्यात आलेले खर्च, उत्पन्न, बचतीचा तपशील द्यावा लागेल. यावर असेसमेंट इयर 2023-24 चे कर स्तर लागू होतात. त्यानुसार किती कर भरावा लागणार हे टॅक्स कॅलक्युलेटर तपासता येऊ शकते.
नवीन कर प्रणालीनुसार AY 2023-2024 साठी इन्कम टॅक्स किती भरावा लागेल हे टॅक्स कॅल्युलेटरवर (Tax Calculator) तपासून घेता येईल.
इन्कम टॅक्स कॅल्युलेटर का आवश्यक आहे? (Why Should you use Income Tax Calculator?)
इन्कम टॅक्स कॅल्युलेटरमुळे करदात्याला नेमका किती कर भरावा लागेल याचा अंदाज घेता येतो. करदात्याने वर्षभरात केलेली गुंतवणूक आणि खर्च आणि त्यातुलनेत कमवलेले उत्पन्न याचा तपशील इन्कम टॅक्स कॅल्युलेटरमध्ये सादर केल्यास त्यावर किती कर भरावा लागेल याची माहिती मिळते. यामुळे करदात्याला योग्य गुंतवणूक करुन कर बचतीचे नियोजन करणे सोपे जाते.
नवीन कर प्रणाली आणि त्यावरील कर
वार्षिक उत्पन्न | नवीन कर प्रणाली (2023) |
0-3 लाख | शून्य |
3-6 लाख | 5 % |
6-9 लाख | 10 % |
9-12 लाख | 15 % |
12-15 लाख | 20 % |
15 लाखांहून अधिक | 30 % |
जुनी कर प्रणाली आणि त्यावरील कर
वार्षिक उत्पन्न | जुनी कर प्रणाली |
0-2.5 लाख | शून्य |
2.5-5 लाख | 5 % |
5 -10 लाख | 20 % |
10-20 लाख | 30 % |
20 लाखांहून अधिक | 30 % |