आपल्यापैकी अनेकांना फिरण्याची, नव्या जागा बघण्याची, नवी शहरं, नवी माणसं बघण्याची आणि अनुभवण्याची हौस असते. प्रवास करणारा माणूस अंतरंगातून विकसित होत राहतो असं उगाचंच म्हटलं जातं नाही. आपल्या बकेट लिस्टमध्ये अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं असतील जिथे कधी ना कधी जाण्याची आपली इच्छा असते. परंतु प्रत्येक ठिकाणं बघणं, फिरणं, अनुभवणं आपल्याला शक्य होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे वेळ आणि पैसा!
वेळ ही गोष्ट आपण कधीतरी आपण मॅनेज करू देखील पण पैशाचं काय? सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही. खिशात पैसाच नसला तर पर्यटन करणार तरी कसं? याच प्रश्नामुळे कधीकाळी आकाश दहिया आणि अभिलाषा नेगी-दहिया हे जोडपे चिंतेत होतं. याचं निमित्ताने त्यांना एका व्यवसायाची कल्पना सुचली, ती म्हणजे 'आधी प्रवास करा, नंतर पैसे भरा' अर्थात, Travel Now, Pay Later.
पर्यटनाविषयी केला अभ्यास
आकाश आणि अभिलाषा यांनी एक अभ्यास करायचं ठरवलं. पर्यटनाविषयी लोकांच्या काय काय समस्या असतात हे त्यांनी जाणून घ्यायचं ठरवलं. यात त्यांना आढळलं की 40% लोक हे पैसे नाहीत म्हणून पर्यटनाला जाणे रद्द करतात. तसेच 70% लोकांना पर्यटनाचे स्वस्त आणि मस्त पर्याय हवे आहेत. सामान्य नागरिकांना पर्यटन करणं सोपं आणि सुलभ व्हावं म्हणून आकाश आणि अभिलाषा यांनी एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा एक स्टार्टअपचं होता. कंपनीला नाव दिलं, सॅनकाश. लॅटिन भाषेत 'सॅन' या शब्दाचा अर्थ होतो 'विना' आणि 'काश' या शब्दाचा अर्थ होतो 'पैसा'. पैशाशिवाय पर्यटनाची संधी देणारी ही कंपनी आहे. या कंपनीने पर्यटकांना ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (TNPL) ची सुविधा उपलब्ध करून दिलीये.
Work from Rome? ??
— SanKash (@SanKashOfficial) February 23, 2023
And go see the wonders it houses, from historical grandeurs to spellbinding architecture.#MoneyForTravel and to set you free.
TRAVEL NOW, PAY LATER
Register Your Travel Interest Today at- https://t.co/ORx59ROnes
#TNPL #SanKash #Travelnowpaylater pic.twitter.com/6Lmy6HhNL4
SanKash ची 74 कोटींची उलाढाल
2018 साली म्हणजे कोविड संसर्गाच्या काही काळ आधी सॅनकाशची सुरुवात केली गेली. आतापर्यंत कंपनीचा 6000 पेक्षा अधिक पर्यटक सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांशी करार झाला आहे. थॉमस कुक, वीणा वर्ल्ड, बालमर लॉरी इत्यादी कंपन्या यांत सहभागी आहेत. तसेच सात बँका आणि वित्त पुरवठा कंपन्यांचा समावेश आहे.या स्टार्टअपला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत कंपनीने 74 कोटींची उलाढाल केली असल्याचे दहिया सांगतात.
सॅनकाशने पर्यटकांना फिरण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविते. तसेच वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना देखील ग्राहकांशी जोडून देण्यात येते. 1-2% प्रक्रिया शुल्क (Processing Fees) आकारले जाते. तसेच वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्याकडून 3% MDR ( Merchant Discount Rate) देखील आकारते. याद्वारे कंपनीला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो.
थेट कुणी पर्यटक सॅनकाशकडे नोंदणी करू शकत नाही. ट्रॅव्हल एजंट किंवा ट्रॅव्हल कंपनीमार्फत इथे नोंदणी केली जाते. ट्रॅव्हल एजंट किंवा कंपनी ट्रिप प्लॅन करून देत असतात. कधी, कुठे आणि कसा प्रवास करणार हे आपली ट्रॅव्हल कंपनी ठरवत असते. मात्र पैशांची कमतरता असेल तर त्याचे समाधान मात्र त्यांच्याकडे नसते. वित्त पुरवठा करण्याचा अनुभव पर्यटन क्षेत्रातील छोट्या व्यापाऱ्यांना नसतो. त्यांच्या या मर्यादा लक्षात घेऊन सॅनकाश वित्त पुरवठा करण्याची सुविधा पुरविण्याचे काम करते.
कशी कराल नोंदणी?
सॅनकाश भारतातील 338 शहरांमध्ये ट्रॅव्हल मर्चंटद्वारे कार्यरत आहे. ट्रॅव्हल, एव्हीयेशन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोठमोठे व्यावसायिक सॅनकाशची संलग्नित आहेत. प्रति प्रवासी 10 लाख रुपयांपर्यंतचे वित्त सहाय्य मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्न करते. पर्यटकांच्या आर्थिक मागणीनुसार आवश्यक ती सुविधा पुरवली जाते. सर्व आवश्यक ती कामे कंपनीतर्फेच केली जातात हे विशेष!
ट्रॅव्हल एजंट किंवा कंपनी यांनी सॅनकाशकडे नोंदणी केल्यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे कंपनीकडे सादर करावी लागतात.
पर्यटकांची आर्थिक व्यवहार देखील तपासून घेतले जातात.त्यानंतर आवश्यकतेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्ज घेतलेले पर्यटक EMI स्वरूपात दरमहा पैसे भरू शकतात. No Cost EMI वर ही सुविधा देण्यात येते.तसेच 1-2 टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाते. म्हणजेच 60,000 रुपयांच्या पर्यटनासाठी तुम्ही जर 3 महिन्यांसाठी लोन घेत असाल तर तुम्हांला दरमहा 20,000 EMI भरावा लागेल. तसेच सुमारे 3000 रुपये प्रक्रिया शुल्क कंपनीला द्यावे लागेल. म्हणजेच या प्रवासासाठी तुम्हांला 60,300 रुपये मोजावे लागतील.
फक्त प्रक्रिया शुल्क घेऊन दिल्या जाणाऱ्या या ट्रॅव्हल लोनला युवा वर्गाची मोठी पसंती मिळते आहे. 2018 पासून 30 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्यात कंपनी यशस्वी ठरली असल्याचे आकाश आणि अभिलाषा दहिया सांगतात.चला तर मग, तुम्ही देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जायचा प्लॅन करत असाल आणि पैशाची अडचण भासत असेल तर लगेच या सुविधेचा फायदा घ्या!
Source: https://rb.gy/aazm4