Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pollution Tax: डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लागणार? काय म्हणाले केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री

Nitin Gadkari

Image Source : www.twitter.com/OfficeOfNG

वाढत्या प्रदूषणापासून लोकांना सुटका मिळावी, यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लावण्याची विनंती करणार असल्याची घोषणा करताच. याचा परिणाम देशातील ऑटो सेक्टरवर पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सध्या तरी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे मंत्र्यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

देशात पेट्रोल डिझेलचा वापर कमी झाल्यास, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसारख्या प्रदूषण वाढवणाऱ्या इंधनांपासून दूर राहून हरित इंधन (green fuels) वापरण्याचे आवाहन 63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) अधिवेशनात केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 

तसेच, ते पुढे म्हणाले की, डिझेलवर चालणारी वाहने आणि जनरेटरचा जास्त वापर होत राहिल्यास, त्यांच्यावर ‘प्रदूषण कर’ म्हणून अतिरिक्त 10 टक्के कर लावण्याचा विचार करू शकतो. तसेच, यावेळी गडकरी म्हणाले की, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्यात यावा, असे पत्र मी आज संध्याकाळी अर्थमंत्र्यांना देणार आहे. मात्र, सध्या तरी सरकार तसा कोणताही प्रस्ताव करणार नसल्याचे त्यांनी नंतर ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

रस्ते वाहतूक मंत्र्यांनी दिली माहिती

रस्ते वाहतूक मंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडिया एक्स प्लॅटफाॅर्मवर ट्वीट करुन माहिती दिली की, डिझेल वाहनांच्या विक्रीवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी सुचवणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सचे स्पष्टीकरण तातडीने करण्याची आवश्यकता आहे. तसेच, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. 

पण, 2070 पर्यंत कार्बन नेट झिरो प्राप्त करणे आणि डिझेलसारख्या घातक इंधनाचा वापर कमी करुन, ऑटोमोबाईल विक्रीत झपाट्याने वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय सक्रियपणे स्वीकारणे अत्यावश्यक आहे. तसेच, ही इंधने आयात पर्यायी, किफायतशीर, स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त असणे आवश्यक आहे.

शेअर मार्केटवर पडला परिणाम

सध्या मार्केटमध्ये एसयूव्हीसारख्या डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे ही घोषणा केल्यानंतर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. दुपारी 12.30 वाजता मारुती सुझुकीचा शेअर 0.69 टक्क्यांनी घसरून 1,0462 रुपयांवर व्यवहार करत होता. तर टाटा मोटर्सचा शेअर 2.63 टक्क्यांनी घसरून 618 रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय आयशर मोटर्सचा शेअर 1.37 टक्क्यांनी घसरून 3,357.65 रुपयांवर व्यवहार करत होता.