Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nashik Real Estate: सामाजिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकसाठी पुढील 2 वर्ष रिअल इस्टेटच्या भरभराटीचे!

Real Estate Of Nashik

Image Source : www.propertybuying.com

Nashik Real Estate: राज्य सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमध्ये अनेक प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याच प्रकल्पांच्या माध्यमातून आगामी दोन वर्षात जवळपास 50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका उपलब्ध होणार आहे.

Nashik Real Estate: देशात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी नाशिक(Nashik) एक आहे. त्याच्या विकासामागचं एक कारण म्हणजे मुंबई(Mumbai) व पुण्यापासून(Pune) नजीक असलेले अंतर. त्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान आणि निसर्गसौंदर्य मन प्रफुल्लित करणारे असल्याने अनेक जणांची नाशिकला घर घेऊन राहण्यासाठी पसंती आहे. याचाच फायदा नाशिकच्या रिअल इस्टेट मार्केटवर(Real Estate Market) दिवसेंदिवस होताना पाहायला मिळत आहे. नाशिक विकसित होण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा हा तेथील सामाजिक पायाभूत सुविधांचा(Social Infrastructure Facility) आहे. गेल्या काही वर्षात अनेक प्रभावी सामाजिक पायाभूत प्रकल्प नाशिकमध्ये आल्याने हा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.  नाशिकच्या रिअल इस्टेटचे मार्केट उंचावण्याचा ठराविक कालावधी आतापर्यंत नोंदविला गेला आहे. यामध्ये 2002 ते 2010 हा आठ वर्षाचा कालावधी या व्यवसायाची व शहर विकासाची भरभराट करणारा ठरला आहे. 
सामाजिक पायाभूत सुविधांच्या भरभराटीमुळे आगामी दोन वर्षात नाशिकच्या रिअल इस्टेटला सुगीचे दिवस येणार आहेत. जवळपास 50,000 पर्यंत सदनिका(Housing Building) विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना देखील प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी हेच दिवस फायद्याचे ठरणार आहे.

कोणत्याही शहराचा विकास हा तेथील पायाभूत सुविधांमुळेच होत असतो. या सुविधा शहर(City) किंवा गाव(Village) विकास करण्यासाठी कारणीभूत असतात. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे. त्यामुळे प्रगतीचा वेग(Growth Ratio High) वाढला असून घरांच्या मागणीत वाढ देखील झाली आहे.

या सामाजिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकचा होतोय विकास

  • नाशिक जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग(Samruddhi Mahamarg)
  • सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग(Surat-Chennai Green Field Highway)
  • पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व पुणे- नाशिक महामार्गाचे विस्तारीकरण(Pune-Nashik Semi High Speed Railway and Widening of Pune-Nashik Highway)
  • प्रस्तावित टायर बेस मेट्रो निओ प्रकल्प(Proposed Tire Base Metro Neo Project)
  • केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाकडून लॉजिस्टिक पार्कसाठी करण्यात आलेली घोषणा(Logistics Park)
  • महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा(Airline connecting important cities)
  • राज्य सरकारचा प्रस्तावित फूड प्रोसेसिंग प्रकल्प(Food Processing Project of State Govt)
  • निफाडचा प्रस्तावित ड्रायपोर्ट(Proposed Dry Port of Niphad)
  • मुंबई- नाशिक महामार्गाचे प्रस्तावित विस्तारीकरण(widening of Mumbai-Nashik highway)

घरे खरेदीसाठी करण्याची मोठी संधी

शहर विकास आराखडा(City Development Plan) 2017 पूर्वी फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे(Farmer) मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या आराखड्यात दुरुस्तीही करण्यात आली परंतु नाशिक संदर्भात पार्किंगचे नियम(Parking Rule) क्लिष्ट करण्यात आल्याने त्यातून मोठे प्रकल्प हाती घेण्यास बांधकाम व्यावसायिक(Builder) पुढे सरसावले नाहीत.मात्र युनिफाईड डीसीपीआर(Unified DCPR) मंजूर झाल्यानंतर हे सर्वच प्रश्न सुटले. राज्य सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमध्ये अनेक प्रकल्प मंजूर झाले. त्याच प्रकल्पांच्या माध्यमातून आगामी दोन वर्षात जवळपास 50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका उपलब्ध होणार आहे. ही ग्राहकांसाठी(Customer) एक सुवर्ण संधी(Golden Opportunities) असणार आहे.