Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO : कमाईची संधी! आजपासून उघडला नवा व्हॅल्यू फंड, 500 रुपयांच्या एसआयपीसह करा गुंतवणूक

Mutual Fund NFO : कमाईची संधी! आजपासून उघडला नवा व्हॅल्यू फंड, 500 रुपयांच्या एसआयपीसह करा गुंतवणूक

Mutual Fund NFO : म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एक नव्या एसआयपीसह व्हॅल्यू फंड आलाय. म्युच्युअल फंड हाऊस असलेल्या बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडनं (बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड) ने हा नवा फंड आणलाय. इक्विटी विभागामध्ये एक नवा व्हॅल्यू फंड (NFO) आणलाय.

म्युच्युअल फंड हाउसची ही नवीन योजना बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड (Baroda BNP Paribas Mutual Fund) आहे. 17 मे 2023पासून या योजनेचं सबस्क्रिप्शन सुरू झालंय. 31 मे 2023पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ओपन एंडेड (Open ended) अशी ही योजना आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदार त्यांना हवं तेव्हा ते रिडीम करू शकतील. कंपनीच्या मते, ही स्कीम इक्विटी (Equity) आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वाढीसाठी फायद्याची ठरू शकते.

फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड एनएफओमध्ये कोणीही एकरकमी किमान 5,000 आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक सुरू करू शकतो. दररोज, साप्ताहिक किंवा मासिक किमान 500 रुपये आणि नंतर 1 रुपयाच्या पटीत पैसे गुंतवता येवू शकतात. समजा त्रैमासिक एसआयपीचा पर्याय निवडला तर तुम्हाला किमान 1500 आणि नंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेमध्ये गुंतवणुकीची कोणतीही अशी कमाल मर्यादा नाही.  

किती गुंतवणूक?

दुसरीकडे, SIP गुंतवणुकीबद्दल बोलताना, तुम्ही दररोज, साप्ताहिक किंवा मासिक किमान रु 500 आणि नंतर रु 1 च्या पटीत पैसे गुंतवू शकता. तुम्ही त्रैमासिक SIP चा पर्याय घेतल्यास, तुम्हाला किमान रु. 1500 आणि नंतर रु. 1 च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. या व्हॅल्यू फंडात कोणताही एन्ट्री लोड नाही. मात्र जर 365 दिवसांच्या आत 10 टक्क्यांपेक्षा जास्त युनिट रिडीम केल्यास 1 टक्का एक्झिट लोन द्यावं लागेल. याचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी (NIFTY) 500 TRI आहे.

गुंतवणूक कोणासाठी फायद्याची?

म्युच्युअल फंड हाऊस बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंडाच्या मते, असे गुंतवणूकदार ज्यांना दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ हवीय, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी निफ्टी 500 TRI अशाप्रकारची कामगिरी किंवा त्याच्या जवळपास जाणाऱ्या कामगिरीशी सुसंगत परतावा (ट्रॅकिंग एरर) पाहिजे असेल, अशांसाठी हा एक चांगला पर्याय असायला हरकत नाही. या स्कीमची गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड सिक्युरिटीजमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपली ठरवलेली उद्दिष्टे साध्य करेल, याची कोणतीही हमी किंवा आश्वासन नाही देण्यात येत नाही, असं फंड हाऊस बडोदा बीएनपी पारिबानं म्हटलं आहे.

ओपन एंडेड

म्युच्युअल फंड एनएफओ (New fund offer) म्हणजे एखादी कंपनी पहिल्यांदाच फंड ऑफर करते. यामाध्यमातून पैसा कमावण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ओपन आणि क्लोज एंड अशा या प्रकारात या योजना दिल्या जातात. बडोदा बीएनपी पारिबाची ही योजना ओपन एंडेड आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या योजनांमध्ये नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूनुसार गुंतवणूकदाराला पैसे गुंतवता येत असतात.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)