State Bank of Pakistan: उपासमारीनंतर पाकिस्तानसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे, सेंट्रल बँकेने एक भयावह विधान केले असून
पाकिस्तानी नागरिकांसमोरचे अधिक गडद झाले आहे. इतर देशांमधून पाकिस्तानात पाठवलेली रक्कम 31 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, इतर देशांमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी लोकांकडून पाकिस्तानात पाठवण्यात येणारी रक्कम सातत्याने कमी होत आहे.
भुकेने त्रस्त पाकिस्तानसमोर आणखी एक नवीन समस्या आली आहे. गेल्या काही दिवसांत, पाकिस्तानी लोकांचे भुकेने रडताना आणि पीठासाठी भांडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नवीन माहितीनुसार, इतर देशांतून पाकिस्तानला पाठवलेली रक्कम 31 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, इतर देशांमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी लोकांकडून त्यांच्या देशात पाठवण्यात येणारी रक्कम सातत्याने कमी होत आहे. डिसेंबरमध्ये ते 2 अब्ज डॉलरच्या 31 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे.
2.04 अब्ज डॉलरपर्यंत घसरला आकडा!
,पाकिस्तान वृत्तपत्र 'द डॉन' मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने सांगितले की डिसेंबर 2022 मध्ये परदेशातून पाकिस्तानला पाठवलेली रक्कम 2.04 अब्ज डॉलर इतकी होती. मागील वर्षी ही रक्कम 2.52 अब्ज डॉलर इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 19 टक्के कमी आहे. परदेशातून येणारा पैसा नोव्हेंबर 2022 2.10 अब्ज डॉलर इतकी होती, नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ही 3% घट आहे.
डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, सलग चौथ्या महिन्यात परकीय चलन कमी झाल्यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात आणखी घट झाली आहे. पाकिस्तानला आधीच परकीय चलनाची कमतरता भासत आहे. यामुळे त्याला इतर देशांकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे.