Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund: म्युच्युअल फंड कंपन्यांनी मे महिन्यात शेअर्समध्ये केली 2,446 कोटींची गुंतवणूक; गुंतवणुकीची कारणे जाणून घ्या

Mutual Fund

Image Source : www.idfcfirstbank.com

Mutual Fund Investment in Stocks: म्युच्युअल फंड कंपन्यांनी एप्रिल 2023 मध्ये शेअर्समधून गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर मे 2023 मध्ये पुन्हा एकदा शेअर्समध्ये 2,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक करण्यामागे नेमके कारण काय, जाणून घेऊयात.

सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. कमी कालावधीत उत्तम परतावा मिळवायचा असेल, तर अनेकांचा कल आता बँक एफडी किंवा पोस्टातील योजनांऐवजी म्युच्युअल फंडाकडे (Mutual Fund) वळलेला पाहायला मिळत आहे. सध्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

बाजार नियामक सेबीच्या (SEBI) आकड्यानुसार म्युच्युअल फंड कंपन्यांनी मे महिन्यात शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 2,446 कोटी रुपयांची झाली आहे. या अगोदर एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर्समधून 4,533 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. एप्रिलनंतर मे महिन्यात ही गुंतवणूक पुन्हा वाढवण्यात आली आहे. ही गुंतवणूक करण्यामागे नेमके कारण काय, जाणून घेऊयात.

गुंतवणुकीचे कारण जाणून घ्या

सध्या बहुतांश लोकांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे कल पाहायला मिळत आहे. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून जवळपास 15 ते 20 टक्के परतावा मिळतो. बाजार नियामक सेबीच्या (SEBI) आकड्यानुसार मे 2023 मध्ये म्युच्युअल फंडातील कंपन्यांनी 2,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जीडीपीचे (GDP) वाढते आकडे, महागाईचा नियंत्रित स्तर आणि अर्थव्यवस्थेतील लिक्विडीटीचा स्तर संतुलित असल्याने म्युच्युअल फंडातील कंपन्यांनी सध्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर आनंद राठी वेल्थचे डेप्युटी सीईओ फिरोज अझीझ (Feroze Aziz, Deputy CEO of Anand Rathi Wealth) म्हणाले की, सध्या पॉझिटिव्ह मॅक्रो नंबर्स आणि निफ्टीचे शेअर्स मूल्य चांगले असल्याने शेअर बाजारात गुंतवणुकीत वाढ होऊ शकते.

मोतीलाल ओसवाल एएमसीचे मुख्य व्यवसाय अधिकारी अखिल चतुर्वेदी (Chief Business Officer of Motilal Oswal AMC Akhil Chaturvedi) म्हणाले की, सध्या बाजारात जीडीपीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्याशिवाय महागाई कमी झाली आहे आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणे शेअर बाजारात राबवली जात आहेत. जागतिक बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या सर्व गोष्टींचा फायदा पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

FPI ची शेअर्समध्ये 43,838 कोटी रुपयांची गुंतवणूक

एफपीआयने (FPI) मे महिन्यात शेअर्समध्ये 43,838 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त आहे. एप्रिल 2023 मध्ये एफपीआयने 11,631 कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतवले होते. गुंतवणुकीमध्ये झालेला हा बदल भारतीय बाजारपेठेसाठी फायद्याचा ठरेल असे, तज्ज्ञांचे मत आहे.

Source: hindi.moneycontrol.com