जर तुम्ही भारताच्या आर्थिक राजधानीला म्हणजेच मुंबई शहराला भेट देण्याचा विचार करत असाल आणि काही दिवस तिथे राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला तुमच्या बजेटची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मर्सर (Merser) या संशोधन संस्थेने जारी केलेल्या 'कॉस्ट ऑफ लिविंग रँकिंग-2023' (Cost of Living Ranking 2023) नुसार भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून मुंबई शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रवाशांसाठी मुंबई हे सर्वात महाग शहर असून या खालोखाल नवी दिल्ली आणि बंगळुरू या शहरांचा क्रमांक लागलाय. पाच खंडातील 227 शहरांमध्ये एक खास सर्वेक्षण केले गेले ज्याद्वारे कॉस्ट ऑफ लिविंग रँकिंग ठरवले गेले आहे. जगातील सर्वात महागडे शहर म्हणून ‘हाँगकाँग’ शहराने पहिला क्रमांक पटकावला. त्या खालोखाल सिंगापूर आणि झुरिच या शहरांचा क्रमांक आहे. जागतिक क्रमवारीत मुंबई 147 व्या स्थानावर आहे. दिल्ली 169 व्या स्थानी, चेन्नई 184 व्या स्थानी, बेंगळुरू 189 व्या स्थानी, हैदराबाद 202 व्या स्थानी, कोलकाता 211 व्या स्थानी आणि पुणे 213 व्या स्थानी. मुंबई आणि दिल्ली ही 2 शहरे आशिया खंडातील प्रमुख 35 महागड्या शहरांमध्ये समाविष्ट आहेत.
According to Mercer's 2023 Cost of Living survey, which includes 227 cities from across five continents, Mumbai, positioned at 147 in the global ranking, retains the top spot as India's most expensive city for expats, while Hong Kong topped the global chart.
— Vishweshwar Raste (@VMRaste) June 8, 2023
According to the…
‘या’ गोष्टींचा सर्वेक्षणात विचार
तुम्हाला माहिती असेल की मराठीतील दिग्गज अभिनेता भरत जाधव याने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई ही आपली कर्मभूमी असली तरी शहरात जगण्यासाठी आवश्यक असलेला खर्च परवडत नसल्याचे कारण देत त्याने मुंबई शहर सोडण्याचा निर्णय घेतलाय. भरत जाधव आपल्या कुटुंबियांसोबत कोल्हापूरला शिफ्ट झालाय. भरत जाधवने मुंबई सोडण्यामागे दिलेली कारणे खरे तर आपण समजून घेतली पाहिजे. मर्सर च्या (Merser) अहवालात देखील याच गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
मर्सर च्या सर्वेक्षणानुसार, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे या भारतीय शहरांमध्ये राहण्याचा खर्च मुंबईच्या एकूण खर्चाच्या 50 टक्क्यांहून कमी आहे. 2023 मध्ये परदेशी नागरिकांसाठी आशियातील 35 सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, वाहतूक-दळणवळणाचा खर्च, कपडे, घरगुती वस्तू आणि 200 हून अधिक वस्तू आणि सेवांच्या किमतींची तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या वाढत्या किंमतीमुळे मुंबईसह वर उल्लेख केलेल्या शहरांमध्ये राहणे सामान्य नागरिकांना अवघड होऊन बसले आहे.
सर्वेक्षणानुसार कोलकाता हे शहर तुलनेने अधिक स्वस्त आहे असे म्हटले आहे. या शहरांत खाण्यापिण्याच्या सुविधा, कपडे, प्रवास, भाजीपाला, घरभाडे परवडणाऱ्या दरात आहेत. कलकत्यात राहणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना जीवनमान राखण्यासाठी फारसा खर्च येत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुंबईमध्ये लागणाऱ्या खर्चाच्या 50% कमी खर्च कोलकाता आणि पुण्यात येत असल्याचे देखील अहवालात नमूद केले गेले आहे.
अहवालानुसार, कॉस्ट ऑफ लिविंग रँकिंग-2023 मध्ये सर्वात स्वस्त शहरांमध्ये पाकिस्तानमधील कराची आणि इस्लामाबाद या शहरांचा समावेश आहे. सध्या पाकिस्तान आर्थिक संकटामधून जात आहे, त्यामुळे हा परिणाम जाणवत असल्याचे अहवालात म्हटले आहे.