Mutual Fund NFO: मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्स फंड आणला आहे. हा एक ओपन एंडेड फंड असून यामधून गुंतवणूकदार कधीही बाहेर पडू शकतात किंवा पैसे काढू शकतात.
मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्स फंड आणला आहे. या फंडचा एनएफओ गुरूवारपासून (दि. 15 जून) सुरू झाला असून, तो 29 जून, 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रोकॅप 250 हा फंड हा भारतातील एकमात्र पॅसिव्ह फंड आहे जो मायक्रोकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रोकॅप 250 हा फंड एक ओपन एंडेड फंड आहे. या नवीन योजनेमध्ये गुंतवणूकदार किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. पण त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी रेग्युलर प्लॅनची निवड केली तर त्याचा एक्सपेन्स रेशो 1 टक्के असणार आहे आणि डायरेक्ट प्लॅनवर 0.40 टक्के असणार आहे.
निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्स हा फंड निफ्टी 500 इंडेक्समध्ये असलेल्या कंपन्या सोडून टॉप 250 कंपन्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आला आहे. हा एक डायव्हर्सीफाय इंडेक्स आहे. निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्सने मागील 3 वर्षात 58 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत.
म्युच्युअल फंडमधील तज्ज्ञांच्या मते, यामध्ये अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली पाहिजे. ज्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला भरघोस परतावा अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी हा एनएफओ चांगला पर्याय ठरू शकतो.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)