Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: Motilal Oswal AMC कडून ओव्हरसीज म्युच्युअल फंड योजना पुन्हा सुरु

Mutual Fund Investment, Motilal Oswal AMC, Overseas Mutual Funds

Motilal Oswal Re-Opens Investing Option For Overseas Mutual Funds : 'मोतीलाल ओसवाल एएमसी'कडून Motilal Oswal S&P 500 Index fund, Motilal Oswal Nasdaq 100 fund of fund आणि Motilal Oswal MSCI EAFE top 100 select index fund यामध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात केल्याची घोषणा नुकताच करण्यात आली.

मोतीलाल ओसवाल एएमसीने  ओव्हरसीज म्युच्युअल फंडांसाठी गुंतवणुकीचा पर्याय पुन्हा खुला केला आहे. 'मोतीलाल ओसवाल एएमसी'कडून Motilal Oswal S&P 500 Index fund, Motilal Oswal Nasdaq 100 fund of fund आणि Motilal Oswal MSCI EAFE top 100 select index fund यामध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास सुरुवात केल्याची घोषणा नुकताच करण्यात आली.1 डिसेंबर 2022 पासून गुंतवणूकदार या योजनेत पुन्हा गुंतवणूक करु शकतात. AMC प्रत्येक कायम खाते क्रमांकासाठी (PAN), दरमहा आणि प्रत्येक स्कीमसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची एकरकमी गुंतवणूक स्वीकारेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

लवकरच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आणि सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) सारखे गुंतवणूक पर्याय पुन्हा सुरु केले जातील, असे कंपनीने म्हटलं आहे. गुंतवणूकदारांनी STP निवडल्यास, ते त्याच फंड हाऊसमधील या योजनांमध्ये इतर कोणत्याही योजनेतून पैसे हस्तांतरित करू शकतात.

सेबीने दिला होता गुंतवणूक थांबवण्याचा सल्ला         

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने फेब्रुवारी 2022 मध्ये म्युच्युअल फंडांना आंतरराष्ट्रीय निधीसाठी गुंतवणूक थांबवण्याचा सल्ला दिला होता. सेबीच्या परिपत्रकानुसार, एकूण उद्योग मर्यादा 7 अब्ज डॉलर आणि 1 अब्ज डॉलर प्रती फंड हाऊस निर्धारित करण्यात आली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) ने फंड कंपन्यांना जूनमध्ये सूचित केले की ते सेबीने निर्धारित केलेल्या मर्यादेचे उल्लंघन न करता परदेशातील फंड गुंतवणूक पुन्हा सुरू करू शकतात.

 'या' स्कीमची कामगिरी खालावली  

म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर परिणाम झाला. 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत मोतीलाल ओसवाल S&P 500, Motilal Oswal Nasdaq 100 Fund of Fund आणि Motilal Oswal MSCI EAFE टॉप 100 सिलेक्ट इंडेक्स फंड हे सर्व अनुक्रमे 5.36 टक्के, 20.33 टक्के आणि 24 टक्क्यांनी खाली आले आहेत.

मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंडमध्ये व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 5,033 कोटी रुपये आहे. मोतीलाल ओसवाल नॅसडॅक  100 फंड ऑफ फंडचे  निव्वळ मालमत्ता मूल्य (NV) 20.3 रुपये आहे, तर मोतीलाल ओसवाल एसअँडपी 500 इंडेक्स फंडाचे NV  14.9 रुपये आहे.

परदेशी शेअर्समध्ये भारतीय इतके गुंतवणूक करु शकतात 

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या एलआरएसप्रमाणे भारतीय व्यक्तीला विदेशी शेअर्समध्ये 2.5 लाख डॉलर्स गुंतवण्याची परवानगी आहे. ही मर्यादा सर्व आंतरराष्ट्रीय खर्चांना लागू होते. 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवलेल्या मालमत्तेच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफा म्हणून कर आकारला जातो आणि आवश्यक स्लॅब दराने कर आकारला जातो.