जगात विविध पदार्थ खाणारे आणि खाण्याचा शौक असणारे अनेक लोक आहेत. खवय्या लोकांना एखादा पदार्थ विशिष्ट हॉटेलमध्ये जाऊनच खायचा असतो. जेवणाची चव, तिथं मिळणारी सेवा आणि माहौल यावरून प्रत्येकाचं आवडतं असं एखादं जेवण्याचं ठिकाण असतं. पण, आज तुम्हलाा अशा रेस्टॉरंटविषयी सांगणार आहे, जिथली चव, वातावरण आणि सेवाही तुम्हाला आवडेल. पण, कदाचित ती परवडणार नाही. कारण, हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट आणि इथं पदार्थासमोरचे दर बघूनच जेवायला आलेल्यांचं पोट भरतं. असं हे दुबईमध्ये असलेलं रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे सब्लीमोशन (SubliMotion). काय आहे तिथली खास डिश. आणि तिची किंमत किती जाणून घेऊया.
एका व्यक्तीच्या जेवणाची किंमत किती?
महागड्या जेवणासाठी प्रसिध्द सब्लीमोशन रेस्टोरेंट (SubliMotion Restaurant) हे एका बेटावर आहे. जागतिक पर्यटकांचं लाडकं ठिकाण दुबईजवळच्या बेटांवर आहे. आणि एका व्यक्तीच्या जेवणाचा खर्च आहे रुपयांमध्ये 1, 30,000 फक्त. मिशेलिन ट्रैवेल गाइड ने या रेस्टोरेंटला जगातील सगळ्यात महागडं रेस्टॉरंट घोषित केले आहे. संपूर्णपणे काचेच्या भिंती असलेल्या या रेस्टॉरंट भोवती आहे एक चालतं बोलतं मत्स्यालय. इथं रात्रीच्या वेळी जेवण घेणं हा वेगळाच अनुभव असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
इथल्या 15-कोर्स जेवणाची किंमत तर चक्क 3,000 अमेरिकन डॉलर आहे. सब्लीमोशन रेस्टॉरंट ही एक चेन असून त्यांची रेस्टॉरंट स्पेन, अमेरिका आणि दुबईत इथंही शाखा आहेत.
महागड्या रेस्टोरंटची विशेषता
आधुनिक इंटिरियरनी तयार या सब्लीमोशन रेस्टोरेंट (SubliMotion Restaurant) मध्ये जेवणाचा अंदाज आणि अनुभव अतिशय वेगळा आहे. हे रेस्टोरेंट एक्वेरियम मध्ये (Aquarium Restaurant)तयार केलेलं आहे. ज्यामुळे याला विशेष मानलं जातं. तसेच इथले प्रचंड महागडे खाद्यपदार्थ असण्यामागे कारण, येथील विशेष प्रकारचे इंटीरियर आहे. वर्चुअल रियलिटी और लाइट एंड साउंड च्या माध्यमातुन एक्वेरियम मधील इंटीरियरला बदलल्या जाऊ शकते. हे रेस्टोरेंट संपूर्ण वर्षभरात केवळ 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत उघडल्या जाते. त्यातच येथे एकावेळी केवळ 12 च लोकं जेवण करु शकतात.