भारतात सोने या धातुपासून तयार केलेल्या दगिन्यांची मोठी बाजारपेठ आहे. मौल्यवान धातू म्हणून लोक सोने किंवा चांदी खरेदी करतात. भारतातील लोक आपल्या आयुष्यातील बहुतांश गुंतवणुक सोन्यात करतात. आज आपण अशा एक दुर्मिळ धातुबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची किंमत सोन्यापेक्षा दुपटीने अधिक आहे. हा धातू म्हणजे रोडीयम (Rhodium) हा आहे.
सोने व प्लॅटिनमपेक्षा किंमत दुपटीने अधिक
जगातील सर्वात महाग धातू रोडीयम याची किंमत प्रतिकिलो 650 हजार डॉलर्सपेक्षा जास्त आहे. इतर धातूंच्या तुलनेने रोडीयमची किंमत जास्त आहे कारण खाणींचे प्रमाण कमी आहे. सोने व प्लॅटिनम यांच्या तुलनेने रोडीयमच्या खाणी कमी आहेत.यामुळे सोन्यापेक्षा रोडीयम धातूचा भाव चारपटीने व प्लॅटिनमपेक्षा दहा पटीने जास्त आहे. एकेकाळी प्लॅटिनम हा जगातील सर्वात महाग धातू होता मात्र कोरोना महामारीनंतर रोडीयमच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली.
ऑटोमोटीव्ह क्षेत्रात मोठा वापर
रोडीयम धातूच्या मागणीपैकी जवळपास 80 टक्के मागणी ही ऑटोमोटीव्ह उद्योगातून येते. या धातूचा वापर हेडलाइट रीफ्लेक्टर्स आणि कॅटलिक कन्व्हर्टर निर्मितीसाठी केला जातो. या धातूची फिल्टर क्षमता कमालीची आहे. यामुळे उत्सर्जित विषारी वायु फिल्टर होण्यास मदत होते. तसेच प्रकाश यंत्र उद्योग आरसा उत्पादन व अनुभट्टी यांसारख्या क्षेत्रात रोडीयम या धातूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.