तुम्हालाही तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर वायफळ गोष्टींवरील खर्च कमी करायला हवा. हा खर्च कमी केला आणि पैशांची बचत (Money Saving) केली तरच भविष्यासाठी मोठा फंड तयार करता येऊ शकतो. आपल्यापैकी बरेच जण उत्पन्नापेक्षा (Income) जास्त खर्च करतात. हा खर्च बहुतांश वेळा गरज नसलेल्या वस्तूंवर अधिकतम केला जातो. त्यामुळे हातात आणि खिश्यात दोन्हीही ठिकाणी पैसे उरत नाहीत.
पैशांची बचत करणे ही एक सवय आहे. ही सवय अंगवळणी पडली, तर लोक सहज आणि दररोज बचत करू शकतात. तुमच्याकडून देखील पैशांची बचत होत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला तीन सोपे उपाय (3 Tips for Money Saving) सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही बचत करू शकता. कोणते आहेत ते उपाय, जाणून घेऊयात.
ऑनलाईन शॉपिंग कमी करा (Reduce online shopping)
सध्या सर्वच वस्तू ऑनलाईनवर उपलब्ध आहेत. काही रिटेल शॉपिंग वेबसाईट माफक दरात या वस्तू उपलब्ध करून देतात. विशेष म्हणजे या वस्तू घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवरून खरेदी करता येतात आणि झिरो डिलिव्हरी शुल्कासह (Zero Delivery Charges) त्या प्राप्त होतात. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाईटवर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आलेल्या असतात. त्यामुळे ग्राहक पटकन कोणताही विचार न करता ऑनलाईन शॉपिंग करतात.
अनेकदा ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहक वापरत देखील नाहीत. ही शॉपिंग करताना ऑनलाईन Transaction केले जाते. ज्यामुळे आपण किती पैसे खर्च करतो याचा ग्राहकांना अंदाज येत नाही. त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करण्यावर कंट्रोल केले, तर तुम्ही मोठ्या रकमेची बचत करू शकता.
क्रेडिट कार्ड फ्रीझ करा (Freeze credit cards)
सध्या बरेच लोक क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करत आहेत. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुमच्या पगारातील काही भाग दरमहा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी जातो. क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे जरी असले, तरीही क्रेडिट कार्डने खरेदी करताना आपण किती पैसे खर्च करतोय हे आपल्या लक्षात येत नाही.
जेव्हा तुम्हाला महिन्याच्या शेवटी क्रेडिट कार्डचे बिल भरावे लागते, त्यावेळी तुम्हाला खर्चाचा अंदाज येतो आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. अनेकदा वेळेत बिल न भरल्यामुळे देखील वापरकर्त्याला दंड भरावा लागतो. त्यामुळे जर तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज नसेल, तर तुम्ही ते फ्रीज केलेले केव्हाही उत्तम ठरेल.
लवकरात लवकर कर्ज फेडा (Pay off the loan as soon as possible)
जर तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज (Loan) असेल, तर तुम्ही निवांतपणे राहू शकत नाही, किंवा खर्चही करू शकत नाही. तुम्हाला सतत मानसिक टेन्शन आलेले पाहायला मिळेल. त्यामुळे घेतलेले कर्ज वेळेत फेडणे गरजेचे आहे. कर्ज घेतल्यानंतर महिन्याला त्याचा हप्ता भरावा लागतो. या हप्त्याची रक्कम मासिक उत्पन्नातून खर्च होते.
तुम्ही जितक्या लवकर कर्ज फेडाल,तितक्या पटकन तुम्ही कर्जातून रिकामे व्हाल आणि बचत करू शकाल. मासिक हप्त्यासोबत वार्षिक आधारावर तुम्ही रीपेमेंट करून कमी कालावधीत कर्ज फेडू शकता.
Source: hindi.moneycontrol.com