Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips for Single Women: एकट्याने जगणाऱ्या महिलांसाठी बचतीच्या टीप्स

Money Saving Tips for Single Women, Single Women Investment Option

Money Saving Tips for Single Women: एकट्याने किंवा स्वतंत्रपणे जगणाऱ्या स्त्रीयांची संख्या वाढत आहे. जीवनातील ध्येयांना आकार देण्याची जबाबदारी ही केवळ तिच्यावर असते. घरातील गोष्टींपासून, परदेश दौऱ्यावर जाण्यापर्यंतच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा त्यांना स्वतःच उभारायचा असतो.

एकट्या स्त्रीला जीवन आपल्या अटींवर जगण्याचे स्वातंत्र्य असते. पण स्वातंत्र्यासोबतच जबाबदाऱ्याही येतात. जीवनातील ध्येयांना आकार देण्याची जबाबदारी ही केवळ तिच्यावर असते. घरातील गोष्टींपासून, परदेश दौऱ्यावर जाण्यापर्यंतच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा त्यांना स्वतःच उभारायचा असतो. पण या सर्वात आजारपणासारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वत:जवळ आर्थिक पाठबळ असणे गरजेचे असते. त्यामुळेच संकटकाळात आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी पैशांची बचत करणे आवश्यक आहे. शिवाय, कष्टाने कमावलेल्या पैशातून आपली ध्येयं साध्य करण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. योग्य नियोजनाने संकटाला आपण सामोरे जावू शकतो. ते कसे ते आज पाहूया.

बजेट तयार करा (Create Your Own Budget)

बजेट आपल्याला आपल्या आर्थिक उद्दीष्टांसाठी पैसे वाचविण्यास सक्षम करते. प्रत्येक महिन्याला जीवनावश्यक वस्तूंसाठी उत्पन्नाच्या 50%, अतिरिक्त खर्चासाठी 30% रक्कम बाजूला ठेवा आणि उर्वरित 20% रक्कम दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी वाचवा. आपत्कालीन निधी म्हणून साधारण सहा ते आठ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम बाजूला ठेवा.

खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्या (Track Your Expenses)

परिणामकारक आर्थिक नियोजनात आपण आपले पैसे कोठे खर्च करीत आहात याची जाणीव असणे याचा समावेश होतो. महिनाभरात कुठे आणि किती खर्च करता याची यादी करा. असं केल्याने आपण अनावश्यक खर्च कुठे व किती करतो हे लक्षात येईल आणि वेळीच त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.

अनावश्यक खर्चाला कात्री लावा (Limit Unnecessary Expenses)

जर तुमचा खर्च तुम्ही ठरवलेल्या खर्चाच्या पलिकडे जात असेल, ज्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होत असेल, तर तुम्ही खर्च कमी करु शकता. अशा अनावश्यक खर्चिक बाबी ओळखण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक सबस्क्रिप्शन्स आणि मेंबरशिप रद्द करा. क्रेडिट कार्डचा वापर आणिबाणीपर्यंत मर्यादित ठेवा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा पेमेंटसाठी डिजिटल पर्याय निवडा.

संपत्ती निर्माण करा आणि बचत वाढवा (Build Your Wealth and Increase Saving's)

प्रियजनांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याव्यतिरिक्त, जीवन विमा योजनेत देखील गुंतवणूकीची उत्तम साधने असू शकतात. ते केवळ आपली संपत्ती आणि बचत वाढविण्यातच मदत करत नाहीत तर चांगला परतावा मिळविण्यात देखील मदत करतात.

उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करा (Generate Secondary Income Source)

आपले उत्पन्न वाढविणे आपल्याला अधिक बचत करण्यास फायदेशीर ठरु शकते.छंद असेल तर त्याचं रुपांतर उत्पन्नाच्या साधनात करण्याचा विचार करा. कमवण्यासाठी आपली कौशल्ये वापरण्यासाठी इंटरनेट अनेक पर्याय उपलब्ध करून देते. फ्रिलान्सिंगच्या संधींवर लक्ष ठेवून रहा. आपली बचत क्षमता वाढविण्यासाठी आपल्या मोकळ्या वेळेत उत्पन्न मिळवा.

जीवन विम्याची निवड करा (Opt For Life Insurance)

भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी नियोजनाबाबत स्त्रिया जागरुक असतात. मात्र कुटुंब आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असू शकते. म्हणूनच टर्म प्लॅन खरेदी करून, कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करू शकता.

निवृत्तीनंतरचे नियोजन करा (Plan For Life After Retirement)

सेवानिवृत्तीनंतरच्या दीर्घ आयुष्याच्या राहणीमानाचा खर्च भागविण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या बचतीपासून लवकर सुरुवात केल्याने आपल्याला दीर्घकाळापर्यंत अधिक आणि अनेक पटीने परतावा मिळतो. जीवन विमा योजना आपल्याला आपल्या सेवानिवृत्तीचे चांगले नियोजन करण्यास देखील मदत करू शकते.