महिलांच्या मागे प्रचंड व्याप असतो, त्यामुळे मग पैशांचे योग्यरित्या मॅनेजमेंट करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरु शकते. तसेच, काही महिलांची आर्थिक पार्श्वभूमी नसते किंवा ते त्यांच्या जीवनातील अन्य उद्दिष्टांपेक्षा पैशाला कमी महत्त्व देतात. याशिवाय पैशांचे मॅनेजमेंट थोडे गुंतागुंतीचे वाटू शकते. मात्र, हे अवघड आहे म्हणून टाळणे. भविष्यात आर्थिक समस्या मॅनेज करणे मुश्कील करु शकते.
Table of contents [Show]
आर्थिक ध्येयं आधीच ठरवा
पैशांचे योग्य मॅनेजमेंट करण्याची पहिली स्टेप म्हणजे आर्थिक ध्येयं ठरवणे आहे. ही ध्येयं कमी अवधीची म्हणजे की सुट्टीसाठी बचत किंवा दीर्घ काळासाठी असेल तर मग रिटायरमेंटचे प्लॅन किंवा घर खरेदी करणे याचा समावेश होऊ शकते. हे ध्येयं ठरवल्याने त्या दृष्टीने वाटचाल करायला सोपं जाऊ शकते.
तसेच, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांना आधी प्राधान्य द्या आणि त्यानुसार फंड तयार करा. याशिवाय वेळोवेळी आर्थिक परिस्थितीनुसार नियमितपणे तुमच्या उद्दिष्टांचा आढवा घेत राहा. त्यामुळे तुमचे ध्येयं पूर्ण कधी होईल याचा अंदाजा लागू शकतो.
खर्चांचा बजेट बनवा
खर्चांचा बजेट सेट करणे, हा पैसे बचतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. यामुळे खर्चावर नियंत्रण राहायला मदत मिळू शकते. कारण, खर्च हा तुमच्या आर्थिक ध्येयांशी सुसंगत आहे, यात तुमची कमाई आणि खर्चांवर ट्रॅक ठेवण्याचा समावेश आहे.
तुम्हाला बेस्ट बजेट बनवायचा असल्यास तुमच्या कमाईचे कॅल्क्युलेशन करा आणि ज्या ठिकाणी खर्च कमी करता येईल अशा गोष्टींची यादी बनवा. तसेच, तुमच्या मासिक कमाईच्या 20 ते 30 टक्के रक्कम बचत करुन ठेवा.
इमर्जन्सीसाठी वेगळा फंड हवा
कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आधीच त्याचा बजेट करुन ठेवणे आवश्यक ठरते. म्हणजे तुमची नोकरी गेली किंवा मेडिकल इमर्जन्सी असली तर अशा वेळी इमर्जन्सी फंड कामी येऊ शकतो. तो जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला अन्य ठिकाणांवरुन पैसे व्याजाने काढायची गरज पडत नाही.
याविषयी बॅंकबाझारचे सीईओ अधिल शेट्टी म्हणतात, कमीतकमी सहा ते नऊ महिन्यांसाठी लागणारा खर्च वेगळा काढा, जो कधीही तुम्हाला काढता येईल. तुम्ही हे पैसे लिक्विड फंड किंवा एफडीमध्ये ठेवू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्वरित पैसे काढू शकता. हे फंड तुम्हाला इमर्जन्सीत खूप कामी येतील.
भविष्यासाठी गुंतवणूक आवश्यक
गुंतवणूक हा काळानुसार संपत्तीत वाढ करण्याचा पावरफूल मार्ग आहे आणि महिलांनी यापासून दूर जाता कामा नये. यामुळे महिलांनी शेअर्स, बाॅण्ड, म्युच्युअल फंड आणि रिटायरमेंट खात्यात पैसे गुंतवण्यालाही प्राधान्य दिले पाहिजे. कारण, हे पर्याय आता सहज उपलब्ध आहेत. फक्त गुंतवणूक करण्याआधी मार्केट रिसर्च गरजेचा आहे.
रिटायरमेंटचा प्लॅन करा
रिटायरमेंटनंतर परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे त्याची सुविधा आधीच करणे गरजेचे आहे. कारण, रिटायरमेंटनंतर योग्य जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील खर्च हाताळण्यासाठी महिलांना अधिक बचतीची आवश्यकता लागू शकते.
त्यामुळे आधीपासून रिटायरमेंटसाठी बचत करणे फायद्याचे ठरु शकते. यासाठी भविष्यातील खर्चांचा अंदाज घेऊन रिटायरमेंटसाठी एक ठरावीक रक्कम महिलांनी गुंतवणे म्हणजे भविष्य सुरक्षित करणे होय.
ध्येयांनुसार फंड तयार करुन महिला त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतात. तसेच, त्यांचे भविष्यही सुरक्षित करु शकतात. त्यामुळे आर्थिक ध्येयं ठरवायला या टिप्स महिलांना नक्कीच कामी येतील.