Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Manage Your Finances: पैशांचे मॅनेजमेंट करायचे आहे? फक्त 'या' गोष्टी करून करा अधिक बचत

Manage Your Finances: पैशांचे मॅनेजमेंट करायचे आहे? फक्त 'या' गोष्टी करून करा अधिक बचत

Image Source : www.finance-monthly.com

Manage Your Finances: आपण पैसा बऱ्यापैकी कमवत आहोत. पण, त्याची मॅनेजमेंट नसल्याने, हातात आलेला पैसा महिना संपण्यापूर्वी कधी संपून जातो हेही कळत नाही. आपण जर त्याचे योग्य मॅनेजमेंट केले तर हातात पैसा राहू शकतो. तर यासाठी काय गरजेचे आहे, हे आपण पाहूया.

पैसे कमवतानाच मॅनेजमेंट करायला सुरूवात केली तर हाती काहीतरी शिल्लक राहते. नाहीतर पैसा आला कधी आणि गेला कधी काहीच समजत नाही. त्यामुळे आलेला पैसा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवू शकता. पैसे गुंतवायचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्ही आलेला पैसा कुठे, किती खर्च करायचा?  याचाही बजेट बनवू शकता. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा खर्चांवर आळा बसेल. तसेच, तुमच्याजवळ कमी कालावधीत चांगला पैसाही जमा होईल. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

असा बनवा बजेट

एखादी आयडिया डोक्यात आली तर लगेच तिच्यावर काम सुरू करणे महत्वाचे असते. याच सुत्राने तुम्ही जर पैसे मॅनेज करायचे ठरवल्यास, तुम्हाला तुमचा बजेट सर्वांत आधी तयार करावा लागेल. यात तुम्ही तुमचा खर्च व उत्पन्न किती आहे यापासून सुरूवात करू शकता. यामध्ये येणाऱ्या गोष्टी जसे की, भाडे, लोन, इन्शुरन्स, शाॅपिंग आणि रोजच्यासाठी लागणारा खर्च यांची यादी बनवू शकता. यामध्ये बाहेर फिरायला किंवा जेवायला जाण्याचा समावेश तुम्ही करू शकता. ती यादी एकदा तयार झाल्यावर आपण त्यात कुठे खर्च कमी करू शकतो. हे ठरवायला तुम्हाला मदत होईल. यातून बचत केलेले पैसे तुम्ही कुठेही गुंतवू शकता. एकदा तुम्हाला ही सवय लागली की तुम्ही तुम्हाला पाहिजे, त्या पद्धतीने खर्चांवर नियंत्रण करू शकता.

अडचणीत  पैसा येईल कामी

एकदा काटकसर करून तुम्ही पैसे बचत केल्यावर त्याचा इमर्जन्सीसाठी वापर करू शकता. एखाद्यावेळी दवाखान्याची इमर्जन्सी आली किंवा नोकरी गेली तर तुम्ही या पैशाचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला लोन घेण्याची किंवा लोकांना पैसे मागण्याची गरज पडणार नाही.  

बचतीसाठी पैसे करा ट्रान्सफर

तुमच्या उत्पनाचा एक हिस्सा बचत करायला सुरूवात करा. त्यासाठी वेगळे खाते उघडून ते ऑटोमॅटिक तुमच्या सॅलरीच्या खात्यासोबत सेट करा. म्हणजे, तुमचा पगार झाल्यावर किंवा तुम्हाला बिझनेसमधून पैसा मिळाल्यावर एक ठराविक रक्कम थेट त्या खात्यात ट्रान्सफर होईल. यामुळे तुमचा इतर गोष्टींवर होणार खर्च आपोआप कमी होईल. तसेच, पैशांची बचत व्हायला मदत होईल.

मार्केट रिसर्च आहे आवश्यक!

तुम्ही पैसे बॅंक किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. बॅंकेत पैसे गुंतवायचे असल्यास, फिक्स्ड डिपाॅझिट (FD) हा चांगला पर्याय आहे. यात ठरलेला व्याजदर तुम्हाला तुमच्या पैशांवर मिळतो. त्याचबरोबर तुमचे पैसे ही सुरक्षित राहतात. यामुळे मोठी रक्कम तुम्हाला एकादाच गुंतवायची असल्यास, तुम्ही एफडी निवडू शकता. एकदाच पैसे येणे शक्य नसल्यास, तुम्ही रिकरिंग डिपाॅझिटचा (RD) पर्याय निवडू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्याला पैसे टाकू शकता. तसेच, तुम्ही त्याची मुदत ही निवडू शकता. मुदत संपल्यानंतर ठरलेल्या व्याजदरासह तुम्हाला रक्कम मिळेल. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवायचा असल्यास, त्यासाठी मार्केट रिसर्च आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. कारण, म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न जास्त मिळत असला तरी यात रिस्क ही तेवढीच आहे. त्यामुळे गुंतवणूक करायच्या आधी मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे.