Shamita Shetty Birthday: आपल्या सर्वांच्याच्या परिचयाची असणारी मोहब्बते गर्ल आणि शिल्पा शेट्टीची(Shilpa Shetty) छोटी बहीण शमिता शेट्टीचा(Shamita Shetty) आज 44 वा वाढदिवस आहे. आजही आपल्याला तिचा मोहब्बते चित्रपट आणि त्यातील तिची व्यक्तिरेखा आठवते. नुकतेच तिला बिग बॉस 15 (Bigg Boss - Season 15) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. शमिता नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शमिताचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत(Manish Malhotra) काम केले. त्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करून काम करण्यास सुरुवात केली. सध्या सोशल मीडियावर शमिता ऍक्टिव्ह आहे, जिथे तिचे 4 मिलियन्स चाहते आहेत. आज शमिताकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊयात.
शमिताची संपत्ती किती?(How much wealth?)
एका मीडिया रिपोर्टनुसार, शमिता ही कोट्यवधींची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती 35 कोटींच्या आसपास आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. जवळपास 2 कोटी किंमत असलेली मर्सिडीज बेंज, तसेच बीएमडब्ल्यू एक्स 6 (BMW X6) ही गाडी देखील तिच्याकडे आहे.
आजपर्यंत केलेले चित्रपट कोणते?(Films)
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बते' या चित्रपटामधून शमिताने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने फरेब, जहर, कॅश या चित्रपटांमध्ये काम करून लोकांची मनं जिंकली. झलक दिखलाजा आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9' या कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या 3 आणि 15 व्या सिझनमध्ये ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच ब्लॅक विडोज या थ्रिलर चित्रपटामध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती.