Marathi Big Boss 4 : मराठी बिग बॉस 4 हा शो चा फिनाले एपिसोड 8 जानेवारी 2023 ला आहे. या शो मध्ये मराठी इंडस्ट्रीतील नामांकित चेहरे पाहायला मिळाले. छोटया पडदयावरून घरा-घरात पोहचलेले आपले आवडते कलाकार या शो स्पर्धक म्हणून चमकत आहेत. हे चमकते स्पर्धक या शो मध्ये किती मानधन घेतात हे जाणून घेऊ.
Table of contents [Show]
अक्षय केळकर (Akshay Kelkar)
छोटया पडदयावरील अभिनेता अक्षय केळकर हा सध्या बिग बॉस 4 या शो मुळे अधिक प्रसिध्द झोतात आला आहे. अक्षयचे वडिल एक रिक्षा ड्रायव्हर असून, त्याने मोठया कठिण परिस्थितीतून इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अक्षय बिग बॉस 4 या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर आठवडयाला 32 हजार रूपये इतके मानधन मिळवतो.

अमृता धोंगडे (Amruta Dhongade)
'मिसेस मुख्यमंत्री' (Misses Mukhyamantri) या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे ही बिग बॉस 4 मधूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.या शो मधील तिचा खेळ प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या शो च्या माध्यमातून अमृता धोंगडे ही दर आठवडयाला 18 हजार रूपये इतकी कमाई करते.

किरण माने (Kiran Mane)
मराठी चित्रपटसृष्ट्रीतील वादग्रस्त अभिनेता किरण माने हा मराठी बिग बॉस 4 मध्ये दिसत आहे. त्याच्या खेळाने तो प्रेक्षकांचे मनदेखील जिंकत आहे. त्याच्या कविता या प्रेक्षकांच्या पसंतीस अधिक पडत आहेत. तसेच राखी सावंतसोबतची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. या स्पर्धकाला दर आठवडयाला 25 हजार रूपये इतके मानधन मिळते.

अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemalekar)
अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris khel chale) या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तिची या मालिकेतील ‘शेवंता’ नावाची भूमिका प्रचंड गाजली होती. आता मराठी बिग बॉस 4 या कार्यक्रमात तिच्याकडे ताकदीची स्पर्धक म्हणून पाहिले जाते. या शो च्या माध्यमातून अपूर्वा नेमळेकर ही दर आठवडयाला 36 हजार रूपये कमविते.

प्रसाद जवादे (Prasad Jawade)
प्रसाद जवादे हा छोटया पडद्यावरील चेहरा आहे. काही मराठी मालिकेतून प्रसादने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. मराठी बिग बॉस 4 या रियालिटी शो मधून प्रसाद जवादे हा 32 हजार इतके मानधन मिळवितो.