सध्या बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड भरावा लागतो. बँका आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अनेक सुविधा देतात, परंतु या सुविधांसोबतच ग्राहकांना काही नियमांचेही पालन करावे लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमान शिल्लक राखणे. प्रत्येक बँकेची किमान शिल्लक मर्यादा वेगळी असते, जी ग्राहकांना राखावी लागते. जर ग्राहकाच्या खात्यातील प्रकारानुसार किमान शिल्लक राखली गेली नाही तर बँक त्याच्याकडून दंड वसूल करते. आज आपण एसबीआय (State Bank of India), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेत ग्राहकांना खात्यात किती मिनीमम बॅलन्स ठेवावे लागते ते पाहूया.
Table of contents [Show]
एचडीएफसी बँक खातेधारकांसाठी किमान शिल्लक नियम
एचडीएफसी बँकेतील सरासरी किमान शिल्लक मर्यादा देखील रेजिडन्सीवर अवलंबून असते. ही मर्यादा शहरांमध्ये 10,000 रुपये, निमशहरी भागात 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,500 रुपये आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा नियम
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Minimum Balance Rules) ने प्रदेशानुसार त्यांच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम निश्चित केला आहे. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 1,000 रुपये आहे. निमशहरी भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात 2,000 रुपये ठेवावे लागतील. तर मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3 हजार रुपये आहे.
आयसीआयसीआय बँकेचा नियम
आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेने प्रदेशानुसार त्यांच्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम निश्चित केला आहे. शहरी भागासाठी 10,000 रुपये, निमशहरी भागासाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये इतकी मर्यादा आहे.
किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांचा दंड रद्द होऊ शकतो
सध्या बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास दंड भरावा लागतो. पण येत्या काळात सर्व काही ठीक झाले तर बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. वास्तविक, वित्त राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी नुकतेच सांगितले होते की, किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खात्यांवरील दंड रद्द करण्याचा निर्णय बँकांचे संचालक मंडळ घेऊ शकतात. एका प्रश्नाच्या उत्तरात कराड श्रीनगरमध्ये म्हणाले होते, “बँका या स्वतंत्र संस्था आहेत. त्यांचे संचालक मंडळ दंड माफ करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात."