Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA Mumbai Lottery: म्हाडाच्या मुंबई लॉटरी प्रक्रियेसाठी अशी तयारी करा?

MHADA Mumbai Lottery 2023 Preparation

MHADA Mumbai Lottery 2023: म्हाडा मुंबईतील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्याच दिवसापासून लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून आहे आणि 18 जुलैला याची सोडत काढली जाणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी खालीलप्रमाणे करून घ्या.

MHADA Mumbai Lottery 2023: म्हाडाने जवळपास 3 वर्षांनी मुंबई विभागातील घरांसाठीची सोडत जाहीर केली आहे. तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. म्हाडा 22 मे रोजी 4083 घरांसाठीची नियमित जाहिरात प्रसिद्ध करणार आहे; जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून लगेच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर तेही मुंबईत खरेदी करायचे असेल तर, त्याची प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या. म्हाडाने उत्पन्नानुसार चार गटात घरांची विभागणी केली आहे. 4083 घरांपैकी 2788 घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी, अल्प उत्पन्न गटासाठी 1022, मध्यम उत्पन्न गटासाठी 132, आणि उच्च उत्पन्न गटासाठी 38 घरे लॉटरीसाठी उपलब्ध असणार आहेत. या व्यतिरिक्त इतर गटामध्ये 102 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

mhada lottry

म्हाडाने जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका सोडतीनुसार उत्पन्नाची मर्यादा सुधारित केली आहे. या सुधारित मर्यादेनुसार एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाची मर्यादा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) 6 लाखापर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 9 लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) 12 लाख आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) कमाल मर्यादा नाही.

म्हाडाची योजना ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध असते. इच्छुक https://lottery.mhada.gov.in/ या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. 22 मे पासून या वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी उपलब्ध होईल. घरासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच ते अर्ज करू शकतात. ज्यांना यापूर्वी म्हाडाचे घर मिळाले आहे. त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

म्हाडाच्या लॉटरी वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी Registration हा पर्याय निवडा. इथे स्वत:ची वैयक्तिक माहिती भरा. आधारकार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, बॅंकेचे डिटेल्स भरून त्यासोबत कागदपत्रे जमा करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारातून अर्ज भरणार आहात त्याची निवड करा. सध्या सुरु असलेल्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जून आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि मगच अर्ज भरण्यास घ्या. तसेच अर्ज भरताना अनामत रक्कम भरावी लागते. तेवढी रक्कम बँकेत शिल्लक ठेवून त्याचे पेमेंट करण्याचे मोडसुद्धा ठरवलेले असेल तर ऐनवेळी अडचण येत नाही. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवे. तसेच त्याच्या नावावर मुंबईत घर नसावे. याशिवाय तो 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील निवासी असावा.

अर्ज भरताना 'या' चुका टाळा

  • अर्जदाराचे नाव, पत्ता आणि कामाची माहिती योग्य भरा. यामध्ये तफावत आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो किंवा या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर पडू शकता.
  • नोंदणी केलेला अर्ज आणि अनामत रक्कम म्हणून भरलेल्या रकमेची पावती सांभाळून ठेवा. शक्य असेल तर ती स्वत:ला मेलवर पाठवून ठेवा. ओरिजनल पावती गहाळ झाल्यास अडचण होऊ शकते.
  • अर्ज भरून झाल्यानंतर ऑरिजनल डॉक्युमेंटची झेरॉक्स काढून त्याचा एक सेल्फ अटेस्टेड सेट तयार करून ठेवा.